शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे कामगारांचे वेतन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

प्रदीप पडोळे : धरणे आंदोलन करण्याचा इशारा तुमसर : घन कचरा व्यवस्थापने अंतर्गत तुमसर शहरातील दैनंदिन उत्पन्न होणाऱ्या कचऱ्याचे ...

प्रदीप पडोळे : धरणे आंदोलन करण्याचा इशारा

तुमसर : घन कचरा व्यवस्थापने अंतर्गत तुमसर शहरातील दैनंदिन उत्पन्न होणाऱ्या कचऱ्याचे संकलन वाहतूक व प्रक्रिया करण्याचे कंत्राट निविदेतून २४ टक्के बिलोने शारदा महिला मंडळ हिवरा बाजार रामटेक यांना दिले आहे. कंत्राटदाराने सन २०१९ ते २०२१ पर्यंत कामे केली. त्यामुळे कंत्राटदाराचे थकीत देयके देण्यात यावे व शहरातील घनकचरा व्यवस्थापन तत्काळ मार्गी लागावा यासाठी प्रशासकीय स्तरावर कसोशीने प्रयत्न केला. विकास कामात आम्ही कमी पडलो नाही, मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे कामगारांचे वेतन थकीत राहिले आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिली.

पडोळे यांनी सांगितले की १४ व्या वित्त आयोग निधीअंतर्गत कंत्राटदाराला डिसेंबर २०२० पर्यंत घनकचरा व्यवस्थापन कंत्राटाचे कार्यादेश देण्यात आले होते. १४ व्या वित्त आयोगात निधी उपलब्ध असून आणि कंत्राटदाराने दर महिन्याला केलेल्या कामाचे देयक सादर करूनसुध्दा सुध्दा कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभाग, न.प.तुमसर यांनी त्यांचे अरेरावीपणामुळे मागच्या २०. महिन्यांपासून कंत्राटदाराचे कोणतेही व कुठलेही देयक देय केले नाही. परिणामी नगराध्यक्ष व नगरपरिषदेच्या बॉडीने सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा ३१ जुलै २०२० मध्ये ठराव क्र.२, सर्वसाधारण सभा २३ मार्च २०२१ मध्ये ठराव क्र. १७/१ आणि सर्वसाधारण सभा ११ जून २०२१ मध्ये ठराव क्र.२३ अन्वये कंत्राटदाराने जेवढे काम केले तेवढे कामाचे देयक त्याला अदा करणेसंबंधी कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभाग, न.प. तुमसर यांना ताकीद दिली. परंतु कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभाग यांनी सभागृहाची अवमानना करून कंत्राटदाराचे २० महिन्याचे देयक काढले नाही.

कंत्राटदाराच्या कामगारांनी याआधीसुध्दा कामबंद आंदोलन केले होते. परंतु नगराध्यक्ष या नात्याने मी शहरातील साफसफाईची कामे सुरू राहण्यासाठी मध्यस्थी करून वारंवार कंत्राटदाराची आणि कामगारांची समजूत घालून आजपर्यंत काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रशासकीय अधिकारी यांनी प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न देता राजकीय दबावामुळे कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभाग यांनी अजूनपर्यंत मोजमाप पुस्तिकेत केलेले कामाची नोंदही केली नाही आणि सादरही केले नाही. परिणामी आज ही कंत्राटदाराचे वेतन देयके थकीत आहेत. काही असामाजिक तत्त्वांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना वेठीस धरून प्रतिमा मलिन करण्याचे कार्य करीत आहेत. शहर विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून या प्रकरणी प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही पडोळे यांनी दिला. पत्रपरिषदेला नगर परिषद उपाध्यक्षा गीता कोंडेवार, विरोधी पक्षनेता अमरनाथ रगडे, बांधकाम सभापती सचिन बोपचे, पाणीपुरवठा सभापती मेहताबसिंह ठाकुर, नगरसेवक सलाम तुरक, राजेश बाळा ठाकूर, राजू गायधने, किरण जोशी,अर्चना भुरे, प्रमोद घरडे, विक्रम लांजेवार, शिव बोरकर व नगरसेवक उपस्थित होते.