ग्रीन फ्रेंडस् नेचर क्लबचा उपक्रम : गिधाड दिनानिमित्त दुर्मिळ गिधाड चित्रकला स्पर्धालाखनी : येथील ग्रीन फ्रेंडस नेचर क्लबतर्फे जागतिक गिधाड संरक्षण दिनाच्या निमित्ताने नेचर क्लब सदस्यांकरिता नष्टप्राय होत चाललेल्या व दुर्मिळ असलेल्या गिधांडावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी ग्रीनफ्रेंडसचे संघटक प्रा. अशोक गायधने ग्रीनफ्रेंडसचे पदाधिकारी दिनकर कालेजवार यांनी गिधाड पक्ष्यांवर आलेल्या संकटाची माहिती दिली. प्रा. गायधने यांनी डायक्लोफेनेक या जनावरांवर वापरायच्या औषधामुळे गिधाड पक्ष्यांच्या प्रजनन तसेच मज्जा संस्थेवर परिणाम झाल्यामुळे त्यांची संख्या रोडावली त्याचप्रमाणे गिधाड पक्षी हा मेलेल्या प्राण्यांवर जगत असल्याने पुर्वीसारखे जनावरे गावाबाहेर टाकले जात नसल्याने निसर्गाचा सफाई कामगार अर्थात गिधाड दुर्मिळ होऊन नष्ट होत चालले असे प्रतिपादन केले.उपस्थित नेचर क्लब सदस्यांना भारतात आढळणारे चारही दुर्मिळ जातीचे गिधाड उपस्थित सदस्यांना काढावयास लावले. यात पांढऱ्या डोळ्याचे गिधाड, भारतीय गिधाड, युरेशियन गिधाड, व राज गिधाड किंवा लाल डोळ्याचे गिधाड या चारही गिधांडाचे महत्व समजावून देण्यात आले. या स्पर्धेत राणी लक्ष्मी विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परिक्षण सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार, प्रा. अर्चना गायधने यांनी केले. मिडलस्कुल गटातुन लक्ष्मी पराग अतकरी तसेच रॉयल पब्लिक स्कुल भंडाराची श्रावणी चंद्रकांत निंबार्ते हिला प्रथम क्रमांक तर तनिशा लक्ष्मण सेलोकरला द्वितीय क्रमांक व पोदार इंटरनॅशनल स्कुल भंडाराचा अथर्व अशोक गायधने हा तृतीय क्रमांक प्राप्त झाला. हायस्कूल गटात पुजा शेखर निर्वाण ला प्रथम क्रमांक तर युक्ता प्रमोद मस्केला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सहभागपर पारितोषिक शर्वरी प्रमोद निखाडे, मौसुद मोटलानी, अर्णव गायधने, सार्थक निखाडे, शौर्य निखाडे यांना प्राप्त झाले. स्पर्धेच्या यशस्वितेकरिता ग्रिनफ्रेंडसचे प्रा. अशोक गायधने, मंगेश चांगले, सतिश पटले, अशोक वैद्य, दिनकर कालेजवार, नितीन पटले, कार्तिक वंजारी, कुणाल सराटे, गगन पाल, बाळकृष्ण मेश्राम, पंकज भिवगडे, मयुर गायधने, शुभम बघेल यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
लाखनी येथे गिधाड संरक्षण दिन
By admin | Updated: September 13, 2016 00:32 IST