शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

19 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 21:56 IST

भंडारा तालुक्यातील खराडी, परसोडी, राजेदहेगाव, खैरी पा., संगम पु., पिंपरी पु., भोजापूर, केसलवाडा, खमाटा, सालेबर्डी, सिरसघाट पु., टेकेपार पु., तिड्डी, बोरगाव बु., इटगाव, सुरेवाडा, तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज,पवनी तालुक्यातील गोसे बुज आणि साकोली तालुक्यातील सिलेगाव टोला या ग्रामपंचायतीची निवडणूक १६ ऑक्टोबर रोजी होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची थेट सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक रविवार १६ ऑक्टोबर रोजी होत आहे. भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ७२ तर १२२ सदस्य पदासाठी ३२५ उमेदवार रिंगणात आहेत. दहा सदस्य अविरोध निवडून आले आहे. जिल्ह्यातील ६५ मतदान केंद्रावर २८ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.भंडारा तालुक्यातील खराडी, परसोडी, राजेदहेगाव, खैरी पा., संगम पु., पिंपरी पु., भोजापूर, केसलवाडा, खमाटा, सालेबर्डी, सिरसघाट पु., टेकेपार पु., तिड्डी, बोरगाव बु., इटगाव, सुरेवाडा, तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज,पवनी तालुक्यातील गोसे बुज आणि साकोली तालुक्यातील सिलेगाव टोला या ग्रामपंचायतीची निवडणूक १६ ऑक्टोबर रोजी होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. १९ ग्रामपंचायतीच्या ६१ प्रभागात निवडणूक होत असून ६५ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून १२२ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. ३२५ उमेदवार रिंगणात आहेत. तर १६ सरपंच पदासाठी ७२ उमेदवार आपले भाग्य अजमावित आहे. त्यासाठी ५४ मतदान केंद्राची नियुक्ती करण्यात आली. २४० कर्मचारी व ५४ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात १९ ग्रामपंचायतीसाठी नियोजन करण्यात आले आहे. पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर दाखल झाल्या आहे. निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी तहसील कार्यालयातही चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

२८ हजार ५५४ मतदार बजावतील हक्क

- जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २८ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात १४ हजार ३६० पुरूष तर १४ हजार १८० महिला मतदारांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील २३ हजार ३२५ मतदार आपला हक्क बजावणार असून त्यात पुरूष ११ हजार ७२४, महिला ११ हजार ६०१ मतदारांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी ३७९७ मतदार असून १९१० पुरूष तर १८८७ महिला मतदार आहेत. पवनी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी ९४६ मतदार असून साकोली तालुक्यात ४७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सोमवारी होणार मतमोजणी- १९ ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी आटोपल्यानंतर सोमवार १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. भंडारा येथे तहसील सभागृहात मतमोजणी होणार आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीची प्रचंड उत्सुकता असून थेट सरपंचाची निवडणूक होत असल्याने मोठी रंगत आली आहे. सर्वांचे लक्ष आता सोमवारकडे लागले आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक