शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

38 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

शुक्रवारी राज्य निवडणूक आयाेगाने स्थगीत केलेल्या ओबीसी प्रवर्गातील जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून  घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमही घाेषित करण्यात आला. आता १८ जानेवारी राेजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३८ जागांसाठी निवडणूक हाेणार आहे. या जागांसाठी सर्व प्रक्रिया नव्याने राबविली जाणार आहे. महिला प्रवर्गातील आरक्षण  काढल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना २९ डिसेंबर राेजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्थगित झालेली निवडणूक आता १८ जानेवारी राेजी हाेत आहे. जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांसाठी निवडणूक हाेत असून, सर्व जागांची एकत्रित मतमाेजणी १९ जानेवारी राेजी हाेणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयाेगाने शुक्रवारी आदेश जारी केला आहे. ओबीसी प्रवर्गातील जागांवर आता सर्वसाधारण गटासाठी निवडणूक हाेणार आहे. दाेन टप्प्यांत हाेणाऱ्या या निवडणुकीने यंत्रणेवर मात्र ताण वाढणार आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३, पंचायत समितीच्या २५ जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली हाेती. उर्वरित ३९  जिल्हा परिषदेच्या आणि ७९ पंचायत समितीच्या जागांसाठी २१ डिसेंबर राेजी  मतदान घेण्यात येत आहे. निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात हाेती. दुसरीकडे अनिश्चिततेच्या वातावरणात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली.शुक्रवारी राज्य निवडणूक आयाेगाने स्थगीत केलेल्या ओबीसी प्रवर्गातील जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून  घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमही घाेषित करण्यात आला. आता १८ जानेवारी राेजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३८ जागांसाठी निवडणूक हाेणार आहे. या जागांसाठी सर्व प्रक्रिया नव्याने राबविली जाणार आहे. महिला प्रवर्गातील आरक्षण  काढल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना २९ डिसेंबर राेजी प्रसिद्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांची एकत्रित मतमाेजणी १९ जानेवारी राेजी हाेणार आहे.

या १३ गटात हाेणार निवडणूक- भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी १८ जानेवारी राेजी मतदान घेतले जाणार आहे. त्यात तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहाेरा, गर्रा, माेहाडी तालुक्यातील कांद्री, डाेंगरगाव, वरठी, लाखंनी तालुक्यातील लाखाेरी, मुरमाडी सा., केसलवाडा वाघ, मुरमाडी तूप, भंडारा तालुक्यातील सिल्ली आणि पवनी तालुक्यातील ब्रह्मी व भुयार गटांचा समावेश आहे.पंचायत समितीच्या २५ गणांची निवडणूक- ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने स्थगित झालेल्या पंचायत समितीच्या २५ गणांची आता निवडणूक हाेत असून त्यात तुमसर तालुक्यातील साखळी, आंबागड, खापा, देव्हाडी, माडगी, माेहाडी तालुक्यातील पांचगाव, माेहगाव देवी, पालाेरा, साकाेली तालुक्यातील कुंभली, वडद, सानगडी, लाखनी तालुक्यातील सालेभाटा, केसलवाडा वाघरे किटाळी, भंडारा तालुक्यातील काेथुर्णा, धारगाव, खाेकरला, काेंढी, पहेला, पवनी तालुक्यातील चिचाळ, पिंपळगाव, काेदुर्ली आणि लाखांदूर तालुक्यातील मासळ, भागडी, पिंपळगाव काे या गणांचा समावेश आहे.

महिनाभर मतपेट्यांची सुरक्षा करावी लागेल- जिल्ह्यात दाेन टप्प्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक हाेत असली तरी मतमाेजणी मात्र एकत्रित १९ जानेवारी राेजी हाेणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ३९ व पंचायत समितीच्या ७९ जागांवरील झालेल्या निवडणुकीच्या मतदान यंत्राची सुरक्षा तब्बल महिनाभर करावी लागणार आहे. यामुळे प्रशासनावर ताण वाढणार आहे.

निवडणूक कार्यक्रम२३ डिसेंबर : सर्वसाधारण महिला प्रवर्गाची आरक्षण साेडत २९ डिसेंबर : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ३ जानेवारी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक४ जानेवारी : उमेदवार उमेदवारी अर्जांची छाननी ७ जानेवारी : उमेदवारी अर्जांवर अपील१० जानेवारी : अपील अर्जांवर सुनावणी१० जानेवारी : उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस व चिन्हवाटप१८ जानेवारी : ३८ जागांसाठी मतदान१९ जानेवारी : सर्व जागांची एकत्रित मतमाेजणी

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद