शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनो, निर्भयपणे मतदान करा

By admin | Updated: November 11, 2016 00:48 IST

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होणार असून या निवडणूकीत पात्र मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूकभंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होणार असून या निवडणूकीत पात्र मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. या निवडणूकीत होणाऱ्या रोखीच्या व्यवहारावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार असून दोषी आढळल्यास सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असे संकेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. मतदानाची गुप्तता पाळण्यात येईल. आपले मत कोणाला गेले हे कोणालाही माहिती पडणार नाही, अशी व्यवस्था आहे. मतदाराचे मतदान व ओळख गोपणीय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी निसंकोचपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या निवडणूकीदरम्यान मतदारास प्रलोभन देण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र मतदारांनी कुठलेही मोठे रोख व्यवहार करु नयेत. मोठया रोख व्यवहाराच्या बँक खात्यावर आयकर विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. समोर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता असे व्यवहार कटाक्षाने टाळावे.विधान परिषदेसाठी भंडारा- गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात आचारसंहिता लागू असून आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले असून तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात आले आहे. अवैध दारु विक्री व डेली स्टॉक नियंत्रीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोशल मिडीयावरील प्रचारावर पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून नियंत्रण ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल मिडीयाचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या ३९३ एवढी आहे. यात जिल्हा परिषद भंडारा ५९, नगर परिषद भंडारा ३५, नगर परिषद तुमसर २५ नगर परिषद पवनी १९, नगर पंचायत मोहाडी १९, नगर पंचायत लाखनी १९, नगर पंचायत लाखांदूर १९ असे भंडारा जिल्ह्यातील १९५ व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद गोंदिया ५९, नगर परिषद गोंदिया ४४, नगर परिषद तिरोडा १९, नगर पंचायत गोरेगांव १९, नगर पंचायत सडकअजुर्नी १९, नगर पंचायत देवरी १९, नगर पंचायत अजुर्नीमोरगाव १९ असे एकूण १९८ स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य मतदार आहेत.या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, मंडळ अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्हयात तहसिल कार्यालय सडक अजुर्नी खोली क्रमांक ८ व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया असे चार मतदान केंद्र आहेत. भंडारा- गोंदिया स्थानिक मतदार संघ निवडणुकीसाठी 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपरोक्त मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून करण्यात येईल. मतपेटया ठेवण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात स्ट्राँगरुम निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)