शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मतदार राजा झाला हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:03 IST

निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांवर दिली आहे़ यामुळे प्रत्येक जण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे दिसते.

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांवर दिली आहे़ यामुळे प्रत्येक जण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे दिसते. याचा नेमका फायदा मतदार घेत असून या धामधुमीत कार्यकर्त्याची फिरकी घेणाऱ्यांचे पूर्ण मनोरंजन चौकाचौकांत पहावयास मिळत आहे़यात हुशारकी मारणाऱ्या कार्यकर्त्यावर तोंडसुख घेऊन पाच वर्षात एकदा आलेली संधी म्हणून यथेच्छ ताव मारणारे तरुणांबरोबर वृद्धही आपला टाइमपास करवून घेताना दिसत आहेत. यामुळे प्रचार करणारा कार्यकर्त्यापेक्षा मतदार राजा हुशार असल्याचे चित्र आहे. एकंदरीत यावेळी जागरूक मतदार सर्व अंदाज फोल ठरवतील, यात शंका नाही़ प्रचार कामात व्यस्त अनेकजण प्रचार करताना सरळ सरळ आमच्या पक्षाला मतदान करा म्हणून सांगतात आपण काही इतरापेक्षा वेगळे व मजबूत कार्यकर्ता म्हणून प्रचार करणारे हुशारकी मारत मतदाराचा अंदाज घेताना घुमून फिरून विचारतात़ ‘काय भाऊ, काका, काकी कसे काय सुरू आहे़’? आपला भाऊ काय म्हणतो, पोजिशन कशी आहे, माहोल बरोबर आहे की नाही, या घाईगर्दीत आपला उमेदवार प्रचंड मताने येणार सांगायला विसरत नाही़याउलट आपण पूर्ण मताचा गठ्ठा पलटवला म्हणून सांगतो़ तेव्हा याउलट काही हुशार मतदारांचा कौल घेण्यासाठी मतदारांना सरळ विचारतो, कुणाला मतदान करून गा़ मतदार त्याला ओळखून असतो़ तु म्हणशील त्याला करून, लगेच त्याची छाती फुगते़ या फुगाफुगीत पटकन मजा घेणाºयाची प्रश्नांची सरबतीही सुरू होते़ मात्र काही विचारू नका तास दोन तास कसे निघून जातात कळतच नाही़ लगेच हातातील मोबाईलवर वेळ पाहून मजा घेणारे एक एक सरकतात व चर्चा संपली की व्यवस्थेला लागतात़ निवडणुका संपल्या की कोण नेता, कुठला कार्यकर्ता व कोण काय असा अनुभव मतदाराना आहे़ यात पक्ष सर्व एकसारखे असतात असा समज मतदाराचा झाला आहे़ यामुळे निवडणुकीच्या काळात गल्ली गल्ली फिरणाºया कार्यकर्त्यांना टारगेट करून त्यांची फिरकी घेणाºयाची संख्या जास्त आहे़ यात हुशारकी मारणाºया व समोर-समोर करणाºया कार्यकर्त्याची गोची करून टिंंगल उडवणाºयाचे गट ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक