शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या

By admin | Updated: March 5, 2017 00:35 IST

यापुढे होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता....

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी : मतदारांमध्ये ईव्हीएम मशीनबाबत संभ्रमाची परिस्थिती भंडारा : यापुढे होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर्स (मतपत्रिका) द्वारे मतदान घेण्यात यावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय गाढवे, जिल्हाध्यक्ष दुधकुवर, उपाध्यक्ष मनोज गोस्वामी यांनी केली आहे.मागील वर्षात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये आणि नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या निवडणूक निकालावरून मतदारांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकांचे निकाल नागरिक आणि मतदारांतील असंतोष पाहता जे उमेदवार निवडून येण्याची १०१ टक्के खात्री होती ते उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकल्या जाऊन पराभूत झाले. यामुळे निश्चितपणे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बदल करून घोळ करण्यात आला असल्याच्या शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका नि:पक्षपाती व्हाव्यात, या भावनेतून मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करीत असतात पण वरील निवडणुकांचे निकाल मतदार नागरिकांच्या मनात असंतोष पसरविणारे आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच ठिकाणी मोर्चे काढण्यात आलीत व आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. याद्वारे ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेला विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे मतदान प्रक्रियेत सुधारणा करणे काळाची गरज आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सुद्धा त्यांच्यापहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदानाला विरोध दर्शवून बॅलेट पेपर्स द्वारे मतदान घ्यावे अशी सूचना केल्यानंतर अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून बॅलेट पेपर्सद्वारे मतदान घेण्यात आले होते. याप्रकरणी केंद्र व राज्य सरकार तसेच निवडणूक आयोगाने मतदार नागरिकांच्या भावनांचा आदर करून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपर्सद्वारे मतदान घ्यावे अशी मागणी बी.आर.एस.पी. चे नेते संजय गाढवे, झेड.आर. दुधकुवर, मनोज गोस्वामी यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)