शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दलित कवितेच्या विद्रोहाला विवेकाचे अधिष्ठान

By admin | Updated: January 26, 2017 00:53 IST

साठोत्तरी काळातील साहित्यात विलक्षण प्रभावी ठरलेल्या दलित कवितेतील विद्रोह हा केवळ विश्वंसक आणि बेदरकार प्रवृत्तीचा नसून त्याला गंभीर विवेकशीलतेचे अधिष्ठान होते,

अमृत बन्सोड : युगसंवादचा कवी आणि कविता उपक्रमलाखनी : साठोत्तरी काळातील साहित्यात विलक्षण प्रभावी ठरलेल्या दलित कवितेतील विद्रोह हा केवळ विश्वंसक आणि बेदरकार प्रवृत्तीचा नसून त्याला गंभीर विवेकशीलतेचे अधिष्ठान होते, याचा प्रत्यय लाखनी येथील कवी सी.एम. बागडे यांच्या कवितेवरून येतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांनी कवी आणि कविता या उपक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून केले.विदर्भ साहित्य संघ शाखा लाखनी, युगसंवाद वाड:मयीन आणि सांस्कृतिक संस्था भंडारा, मैफल लाखनी आणि ब्रोकनमेन सोशल मुव्हमेंट लाखनीच्या वतीने कवी आणि कविता या उपक्रमाचे आयोजन विवेकानंद वाचनालय लाखनी येथे करण्यात आले होते. निमंत्रित कवी म्हणून सी.एम. बागडे हे होते. कवी सी.एम. बागडे यांच्या अष्टदशकपूर्ती निमित्ताने त्यांचा शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मुरलीधर भांडारकर, विलास लाखनीचे अध्यक्ष ह.रा. मोहतुरे विचारमंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी रमेश पवार यांनी सी.एम. बागडे यांच्या गझलेचे सुरेल गायन केले. कवी बागडे यांची प्रकट मुलाखत दिनेश पंचबुद्धे यांनी घेतले. आंबेडकरी प्रेरणेतून आणि स्वाभिमानी स्वभावामुळे आपण जीवनात यशस्वी झालो, असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर कवी सी.एम. बागडे यांनी त्यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन केले. त्यांच्या काव्यलेखनावर डॉ. धनंजय भिमटे आणि प्रा. संजय निंबेकर यांनी आस्वाद प्रतिक्रिया नोंदविल्या. कवी लखनसिंह कटरे यांनी उत्स्फूर्त मनोगत नोंदविले.यावेळी प्रतिभा शहारे यांनी बागडे यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक प्रमोदकुमार अणेराव यांनी तर आभार ह.रा. मोहतुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)