शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी दौऱ्यावर, समस्या वाऱ्यावर

By admin | Updated: November 11, 2016 00:49 IST

विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य, पंचायत समिती सभापतीचे भाग्यच उजळले.

नगरसेवक, जि.प. सदस्य पर्यटनाकरिता रवाना : नगराध्यक्ष, मोजके नगरसेवक शहरातसिराज शेख  मोहाडीविधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य, पंचायत समिती सभापतीचे भाग्यच उजळले. मागील १५ ते २० दिवसापासून सर्वच पदाधिकारी पर्यटनासाठी गेले आहेत. कुणी नेपाळला तर कुणी केर, कर्नाटक, तामिलनाडू येथे परिवारासह भ्रमंती करीत आहेत. मोहाडी नगर पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक भ्रमंतीवर असल्यामुळे नागरिकांना रहिवासी दाखला व अन्य कामांसाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील काही नगरसेवक सामान्य कुटुंबातील असून त्यांच्यासाठी तर विधान परिषद निवडणूक पर्वणी ठरली आहे. या निवडणुकीत एका मतदाराच्या मताला लाखोंचे मुल्य असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगर पंचायत निवडणूक होऊन एका वर्षातच त्यांचे भाग्य झळकले आहे. मात्र त्यांना ज्या सामान्य मतदारांनी निवडून दिले त्यांचे प्रश्न मात्र अजुनही तसेच आहेत. रस्ते दुरूस्ती, नाल्यांची स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी अशा समस्या कायम आहेत. परंतु नगरसेवकांच्या समस्या मात्र सुटणार आहेत. आता जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी हे नगरसेवक कामाला लागतील का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. येथील नगर पंचायत मुख्याधिकारी स्नेहा करपे यासुद्धा प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेलेल्या आहेत. त्या दोन दिवसानंतर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांअभावी मोहाडी नगरपंचायत पोरकी झाली आहे. बुधवारला तर मोहाडी नगरपंचायतीत एकही जबाबदार व्यक्ती हजर नव्हते. नगरसेवक दर्शनाला गेले असून मुख्याधिकारी प्रशिक्षणाला पुणे येथे असल्याने नागरीक वाऱ्यावर आहेत. ग्रामीण भागात दिवाळीनंतर मंडईचा जल्लोश असतो. विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना बोलावले जाते. मात्र लोकप्रतिनिधी दर्शनावर गेल्याने आयोजकांचा हिरमोड होत आहे. मोहाडीत चार पाच ठिकाणी मंडईचा कार्यक्रम होत असतो. मात्र नगरसेवक उपलब्ध नसल्याने आयोजकांपुढे उद्घाटनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मुख्याधिकारी तसेच सर्वच्यासर्व नगर पंचायत सदस्य उपस्थित नसल्याने नगर पंचायत सध्या रामभरोसे आहे.