साकोली : विपश्यना ही ध्यान धारणेची एक पद्धती आहे. आपले मन श्वासोच्छवासाबरोबरच शरीरावरील आणि शरीरांतर्गत संवेदनांकडे वळवायचे. विपश्यना म्हणजे शरीरावरील आणि शरीरांतर्गत संवेदनांचे दर्शन म्हणजे विपश्यना होय, असे प्रतिपादन विपश्यना प्रशिक्षक शाहिद कुरैशी यांनी केले.स्थानिक कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात आयोजित विपश्यना ध्यानसाधना कार्यक्रमात विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक खेडीकर, मनिषा काशिवार, बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्यानसाधनेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी खेडीकर यांनी ताणतणावमुक्तीचे शिक्षणाचे गरज व व जीवन जगल्याची कला याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दररोज शेवटची तासिका शालेय मैदानावर वसवून आनापान क्रीया मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी दररोज घेण्यात येत आहे. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक विठ्ठल सुकारे, शिवपाल चन्ने, दिनेश उईके, सवेक कापगते, मुंगमोडे, रणदिवे, आगाशे, बालकृष्ण लंजे, हिवराज येरणे यांचे सहकार्य मिळते. (तालुका प्रतिनिधी)
शरीरांतर्गत संवेदनांचे दर्शन म्हणजे विपश्यना
By admin | Updated: August 23, 2014 23:49 IST