शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत पोहचण्यासाठी गावकऱ्यांना रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:33 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते चार फुट पाण्यातून चक्क गावकºयांना पे्रत न्यावे लागत आहे.

ठळक मुद्देगुडघाभर पाण्यातून प्रवास । बिनाखी ग्रामस्थांचा प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बिनाखी गावाचे नाल्या शेजारी असणाºया स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता आणि पुलाचे बांधकाम करण्यात आले नसल्याने पावसात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मृतदेहाासह प्रवास करावा लागत आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते चार फुट पाण्यातून चक्क गावकऱ्यांना पे्रत न्यावे लागत आहे. रस्ता आणि पुल बांधकामाची गावकऱ्यांची जुनी मागणी आहे. परंतु या मागणीला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. प्रशासन गावकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.गावाशेजारी दुसरी स्मशानभूमि नसल्याने भर पावसात चिखल तुडवत स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागते. स्मशानभूमीत कित्येक वर्शांपासून रस्ता, पुलाचे बांधकाम झाले नसल्याने अन्य सुविधा प्रभावित झाल्या आहेत. पिण्याचे पाणी, सभामंडप, हातपंप आदी सुविधा नाहीत. या सुविधांसाठी ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा ग्रामसभेत ठराव देवूनही परिस्थिती जैसे थे दिसत आहे. गावकºयांनी सर्वानुमते घेतलेल्या ठरावाची ठरावाची साधी दखल घेण्यात आलेली नाही. शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गावकºयांनी प्रशासनाविरोधात लवकरच आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा