आलेसूर येथील उपक्रम : वाघमारे यांचाही सहभागलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाणी हे जीवन असून मानवी उपद्रव्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोताची पातळी खोल गेल्याने सर्वांना जलसंकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून लोकसहभागाच्या योजना सुरु केल्या आहेत. या माध्यमातून जनतेच्या श्रमदानातून जलसंवर्धनाचे भरीव केले जात असून याला लोकचवळीचे स्वरुप आले असल्याने सर्वांनी एकत्र येवून श्रमदानातून जलसंवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी आलेसूर येथील कार्यक्रमात व्यक्त केले.तुमसर तालुक्यातील आलेसूर येथील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्र. ४० मधील वन तालावातील लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि.प. सदस्य संदीप ताले, पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सरपंच गोपिका मेहर, उपसरपंच संजय इळपाचे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, वनपरिक्षेत्राधिकारी सुनिल मडावी, ग्रा.पं. सदस्य खुशाल राऊत, नंदलाल खंडाते, वनक्षेत्र सहाय्यक श्रीराम केकान, ग्रामसेवक भारत जिभकाटे, रामचंद्र राऊत, दुर्गाप्रसाद भट, अशोक वाढीवे, निलेश श्रीरंग, वनसमिती अध्यक्ष नारायण पारधी, राजेश चौधरी, निलकमल पारधी, आशा वाघाडे, बबिता सलामे, स्वा.करमरकर, प्रकाश कोहळे, ओम करमरकर, हेमराज मेहर, बालचंद सोनवाने, भीवाराम मेहर, मंगला आहाके व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांसोबत तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान करून ट्रॅक्टरमध्ये गाळ फेकण्याचे काम केले. या तलावातील गाळ काढल्यामुळे तलावातील पाण्याच्या संचयास वाढ होईल व शिवारात गाळ टाकल्यामुळे शेतातील पिक जोमदार येतील. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होवून फायदा होईल. वनतलावात पाणी साचल्याने वनप्राण्यांना पाण्याची दीर्घकाळ सोय होवून वनप्राण्याचे त्यामुळे संवर्धनही करण्यात मदत मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक दायीत्व पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावे असे आ.चरण वाघमारे यांनी उपस्थितांना आवाहन केले. यासाठी श्रमदान करण्यासाठी गावातील महिला व पुरुष तसनवर्ग विविध मंडळानी सक्रीय सहभाग घेत ४१० गावकरी व वनतलावातील सर्व कर्मचारी यांनी वनतलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. हा अभिनव उपक्रम राबविल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.
श्रमदानासाठी ग्रामस्थ एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:17 IST