शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यादानाचे हात सरसावले कोविड रुग्णांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:36 IST

भंडारा जिल्ह्यात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यादृष्टीने सुविधा कमी पडत आहेत. रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी मदत ...

भंडारा जिल्ह्यात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यादृष्टीने सुविधा कमी पडत आहेत. रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी मदत करीत असतानाही ही मदत तोकडी पडत आहे. तेव्हा कोविड रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे. वाढत्या कोविड प्रादुर्भावाने अनेकांचा मृत्यू होत आहे. अनेक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी लाखनी तालुक्यातील विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या साद माणुसकीची समूह, लाखनी व इतर सहृदयी शिक्षकांनी पुढाकार घेतला. कोविडच्या संकटकाळात रुग्णांना मदत करण्याबाबत समूह सदस्यांनी समूहात चर्चा केली व या रुग्णांना मदत करण्याचे ठरवले. अवघ्या दोन दिवसांत अडीच लाखांपेक्षा जास्त निधी समूह सदस्यांनी व इतर सहृदयी शिक्षकांनी संकलित केला. काही मोजक्या समूह प्रतिनिधींनी तहसीलदार व गटविकास अधिकारी, लाखनी यांची संयुक्त भेट घेऊन तालुक्यातील कोविड रुग्णांच्या समस्या व त्यांना नितांत गरज असलेल्या वस्तू व साहित्याबाबत चर्चा केली. त्यानुसार कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी वॉशिंग मशीन, ॲटोमॅटिक सॅनिटायझर ड्रॉप मशीन, हॉट अँड कोल्ड वाटर मशीन, इंडक्शन मशीन, स्टील केटल, इमर्जन्सी लाइट्स, सॅनिटायझर, चादर, ब्लिचिंग पावडर, हँडवॉश बॉटल्स, वॉशिंग पावडर, फिनाईल, टॉयलेट क्लीनर, बकेट्स तसेच रुग्णांसाठी कीट तयार करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक साहित्याची पॅकिंग करून देण्यात आली. तसेच इतरही अत्यावश्यक साहित्य संकलित निधीतून रुग्णांसाठी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. साहित्य सुपूर्द कार्यक्रमप्रसंगी नायब तहसीलदार दोनोडे उपस्थित होत्या. तसेच समूहातील प्रमोद हटेवार, श्रीधर काकीरवार, राम चाचेरे, चंद्रशेखर गिऱ्हेपुंजे, रवींद्र म्हस्के, निशिकांत बडवाईक, ज्ञानेश्वर लांडगे, सतीश वासनिक, प्रमोद खेडीकर, लालबहादूर काळबांधे, संतोष सिंगनजुडे, चेतन भुळे, योगीराज देशपांडे उपस्थित होते.

कोट

आपले सामाजिक दायित्व ओळखून या कठीण काळात या समूहातील सदस्यांनी व इतर सहृदयी शिक्षकांनी हिरीरीने निधी संकलित करत कोविड रुग्णांना सर्वतोपरी प्रत्यक्ष मदत केली, हे स्तुत्य व अभिमानास्पद कार्य आहे.

मल्लिक विराणी, तहसीलदार, लाखनी

कोट

समूहातील सदस्यांनी व इतर सहृदयी शिक्षकांनी एकत्रित येत कोविड रुग्णांना जो मदतीचा हात दिला, तो कौतुकास्पद आहे. आपणही समाजातील एक घटक असून, गरजूंना मदत करण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.

डॉ. शेखर जाधव, गटविकास अधिकारी, लाखनी

कोट

ज्ञानदानाचे कार्य करत असताना आम्हीही या समाजाचे घटक असून, आपली नैतिक जबाबदारी व सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून आम्ही एकत्रित आलो व सर्वजण सोबतीने सामाजिक कार्य करत आहोत.

पुरुषोत्तम झोडे, समूहप्रमुख, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक