शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत व्हिडिओ पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:26 IST

नागरिकांकडून पैसे घेऊन व्हिडिओ पॉर्लर सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत एक लाख ७६ हजार ४५० रूपयांच्या मुद्देमालासह ११ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पवनी पोलिसांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात केली.

ठळक मुद्दे११ जण ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आॅनलाईन लोकमतभंडारा : नागरिकांकडून पैसे घेऊन व्हिडिओ पॉर्लर सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत एक लाख ७६ हजार ४५० रूपयांच्या मुद्देमालासह ११ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पवनी पोलिसांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात केली.अरूण शेंडे, दिलीप मेश्राम, मनोहर बावनकर, अमिन खान, कपिल राऊत, मारोती तेलमासरे, इमरान शेख, मोहन तुरस्कर, रोषन मुंडले, पिंकू लांजेवार, रामचंद्र पाटील अशा ११ जणांना व्हिडीओ पॉर्लरमध्ये पैशाचा जुगार खेळताना ताब्यात घेतले. पवनी येथील बेलघाटा वॉर्डातील अरूण शेंडे हे त्यांच्या ताब्यातील घरात स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे घेऊन व्हिडीओ मशीनच्या माध्यमातून पैसे हार-जीतचा जुगार खेळवित होता, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी पवनीचे पोलीस निरीक्षक एस.बी. ताजने यांच्या पथकासह जुगार सुरू असलेल्या घरावर सोमवारला छापा घालून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ७६ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कोल्ड्रींक सेंटरमध्ये दारू विक्रीअड्याळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पहेला येथील धनराज चवरे यांच्या मालकीच्या तिलक कोल्ड्रींक सेंटरमध्ये मागील काही दिवसांपासून देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाला. सेंटरवर टाकलेल्या छाप्यात कोल्ड्रींक दुकानाच्या नावाखाली दारूविक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यात १६ शिशा विदेशी दारूचे तर १६ शिशा देशी दारूचे असा चार हजार ३०७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.