शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील खासदारांचा राजीनामा मागणार

By admin | Updated: July 14, 2017 00:54 IST

भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे दिलेले आश्वासन तीन वर्ष उलटूनही पाळले नाही.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धारलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे दिलेले आश्वासन तीन वर्ष उलटूनही पाळले नाही. त्यामुळे भाजपा सरकार चलेजाव या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भातील खासदारांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे मुख्य नियंत्रक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गेली चार वर्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती लढा देत आहे. भाजपा सरकार मागणीला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे क्रांती दिनापासून ९ आॅगस्ट आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. ९ आॅगस्ट रोजी नागपूर येथील विदर्भ चंडीकेची पुजा करून विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानी मोर्चा नेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे, असे विचार समितीचे मुख्य नियंत्रक राम नेवले यांनी व्यक्त केले. विदर्भ स्वयंपूर्ण आहे. राज्य निर्मिती झाल्यास येथील शेतकरी सुखी होईल त्यांचे डोक्यावर कर्जाचा बोझा नसेल. सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध होईल. विदर्भात वीज, वनसंपत्ती व सिंचन उपलब्ध असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षमता आहे. लहान राज्य सुखी राज्य ही संकल्पना वास्तवात उतरविण्यासाठी विदर्भ राज्य देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव वंजारी, कोअर कमेटी सदस्य विष्णू आष्टीकर, अर्जून सुर्यवंशी, माजी प्राचार्य के.एम. नान्हे, युवा आघाडी अध्यक्ष तुषार हट्टेवार, जिल्हा मत्स्य उत्पादक सह संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, डॉ. विक्रम राखडे, नगरसेविका शोभना गौरशेट्टीवार, दामोधर क्षीरसागर, बंडू रामटेके, डॉ. राजेश नंदुरकर, डॉ. सुनिल जीवनतारे, मनोज शेंडे, फागो दिघोरे, धनराज नागपूरे, रमेश शिवरकर व समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.