शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

इंधन खर्चात उपाध्यक्ष, वाहन दुरूस्तीत सभापतीची आघाडी

By admin | Updated: November 4, 2015 00:31 IST

मागील पाच वर्ष जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींवर जिल्हा निधीतून जिल्हा परिषदेने लाखोंचा खर्च केला.

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या खर्चाचा लेखाजोखा : तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर लाखोंचा खर्चलोकमत विशेषप्रशांत देसाई  भंडारामागील पाच वर्ष जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींवर जिल्हा निधीतून जिल्हा परिषदेने लाखोंचा खर्च केला. त्यात मानधन, वाहन, घरभाडे व प्रवास भत्ता व अन्य खर्चाचा समावेश आहे. मागीलवर्षी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी वाहनाच्या इंधन खर्चावर ३.२६ लाख तर माजी कृषी सभापती संदीप टाले यांनी वाहन दुरूस्तीवर ५० हजार रुपये खर्च केले. उपाध्यक्ष व कृषी सभापती दोघांनीही खर्च करण्यात आघाडी घेतल्याचे खर्च विवरणावरून दिसून आले आहे.जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षात भाजपची सत्ता होती. सन २०१० ते २०१५ चा पदाधिकाऱ्यांच्या खर्चाचा तपसील जाणून घेतला असता त्यात पदाधिकाऱ्यांवर लाखोंचा खर्च करण्यात आल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना एका वर्षासाठी इंधन खर्चासाठी सहा हजार लिटरची मर्यादा आहे. उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींना चार हजार लिटर इंधन खर्चाची मर्यादा आहे. त्यात मागीलवर्षी सन २०१४-१५ या एका वर्षात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी इंधनावर सर्वाधिक ३ लाख २५ हजार ९६९ हजार रूपये खर्च केले. वाहन दुरूस्तीच्या खर्चाची मर्यादा ५० हजारांची असल्याने कृषी सभापती संदीप टाले यांनी त्याचा पुरेपूर लाभ उचलून ५० हजार खर्च केले.इंधनावर खर्च करणाऱ्यांमध्ये उपाध्यक्षानंतर महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा भुसारी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी २ लाख १४ हजार ७९३ रूपये खर्च केले. कृषी सभापती संदीप टाले यांनी २ लाख १३ हजार १५ रूपये खर्च करून तिसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांनी अन्यांच्या तुलनेत ते मागे नसल्याचे दाखवून दिले. इंधन खर्चावर समाजकल्याण सभापती अरविंद भालाधरे यांनी १ लाख ९९ हजार ३८९ रूपये, अध्यक्ष वंदना वंजारी यांनी १ लाख ७५ हजार १७३ रूपये तर सर्वात कमी अर्थ व आरोग्य समिती सभापती संजय गाढवे यांनी १ लाख ५९ हजार ७७० रूपयांचा खर्च केला आहे.वाहन दुरूस्तीवर खर्च करणाऱ्यांमध्ये कृषी सभापती संदीप टाले आघाडीवर आहेत. त्यांनी मागील वर्षी शासनाकडून मिळणारा ५० हजारांचा सर्व खर्च वाहनावर केला असून असे करणारे ते पहिले सभापती ठरले आहे. त्यांच्यानंतर समाजकल्याण सभापती अरविंद भालाधरे यांनी खर्च केला असून त्यांचा खर्च ४८ हजार ३१ रूपयांचा आहे. त्यांनतर उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी ३९ हजार ५२४ रूपये, अर्थ व आरोग्य समिती सभापती संजय गाढवे यांनी ३३ हजार २३१ रूपये, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा भुसारी यांनी ३३ हजार ३१२ रूपये तर सर्वात कमी वाहनावर खर्च अध्यक्ष वंदना वंजारी यांनी केला असून त्यांचा खर्च २७ हजार ३१५ रूपयांचा झालेला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती यांनी मागीलवर्षी इंधनावर १२ लाख ८८ हजार १०९ रूपये तर वाहनावर २ लाख ३१ हजार ४१३ रूपयांचा खर्च उचल केल्याचे दिसून येत आहे.प्रवास खर्चाची नोंद नाहीपाच वर्षाच्या कार्यकाळात पहिल्या अडीच वर्षात कृषी पशुसंवर्धन समिती सभापतींचा कार्यकाळ २०१० ते १३ पर्यंत होता. त्यानंतरच्या पुढील वर्षात कृषी सभापतीपद व्यक्ती विशेषानुसार बदलले. अर्थ व बांधकाम समिती सभापतीकडे सदर पद देण्यात आले. या पाच वर्षातील या विभागाच्या सभापतीला प्रवास खर्चापोटी देण्यात आलेल्या खर्चाची नोंद जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागात नसल्याची बाब समोर आली आहे.पदाधिकाऱ्यांना मिळाले लाखोंचे मानधनजिल्हा परिषद अध्यक्षांना प्रती महिना २० हजार रूपये, उपाध्यक्षांना १५ हजार, सभापतींना १२ हजार रूपये मानधन मिळते. या मानधन व प्रवास खर्चात सन २०११-१२ मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. अध्यक्षांना सन २०१० ते २०१५ पर्यंत जिल्हा परिषदने मानधनापाटी ७ लाख २० हजार, उपाध्यक्षांना ५ लाख ४८ हजार, तर अन्य विषय समिती सभापतींना चार लाख ६२ हजार ५८० रूपये देण्यात आलेले आहे. प्रवास खर्चात अध्यक्षांनी मारली बाजीअडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ उपभोगणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना प्रवास खर्च देय असतो. यात पाच वर्षाच्या कार्यकाळातील दोन्ही अध्यक्षांनी मिळून सर्वाधीक प्रवास खर्च उचलला आहे. त्यांनी २ लाख ५२ हजार ३६८ रूपयांची उचल केली आहे. तर उपाध्यक्षांचा प्रवास खर्च १ लाख २७ हजार ४३२ रूपये, समाजकल्याण सभापतींचा खर्च १ लाख १० हजार १८५ रूपये, महिला व बालकल्याण समिती सभापती यांनी १ लाख १ हजार ३७८ रूपये तर सर्वात कमी प्रवास खर्च कृषी व पशु संवर्धन सभापतींनी केला आहे. त्यांचा पाच वर्षातील खर्च ९३ हजार ४४७ रूपयांचा झाल्याची नोंद आहे.घरभाडे भत्त्यात बांधकाम सभापती समोरजिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासासाठी बंगला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे स्वत:चे निवास व्यवस्था नाही. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना घरभाडे देण्यात येते. यात सन २०१२-१३ पासून सर्वाधिक घरभाडे भत्याची उचल करणाऱ्यामध्ये सर्वात आघाडीवर अर्थ व बांधकाम समिती सभापती आहेत. त्यांनी तीन वर्षात २ लाख ४ हजार ३०० रूपये, उपाध्यक्षांनी १ लाख ८४ हजार ८१५ रूपये, महिला व बालकल्याण सभापतींनी १ लाख ७३ हजार २९० रूपये, समाजकल्याण सभापतींनी १ लाख ६० हजार ८०३ रूपये तर कृषी व पशु संवर्धन सभापती यांनी १ लाख ५९ हजार २९ रूपयांची उचल केली आहे.