शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय डॉक्टरांचा गोरखधंदा

By admin | Updated: January 18, 2015 22:40 IST

पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरचा सुळसुळाट वाढला असून हे डॉक्टर पशुपालकांना लुबाडीत आहेत. तालुक्यात १५ च्या जवळपास बोगस पशुवैद्यकीय डॉक्टर कार्यरत आहेत.

कोंढा/कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरचा सुळसुळाट वाढला असून हे डॉक्टर पशुपालकांना लुबाडीत आहेत. तालुक्यात १५ च्या जवळपास बोगस पशुवैद्यकीय डॉक्टर कार्यरत आहेत. पण याकडे पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत आहे.कोंढा येथे बुधवारला म्हैस, गाय बाजार भरतो. येथे दूरवरून नागरिक पशुधनाच्या खरेदी-विक्री करण्यासाठी येत असतात. त्यामुळे कोंढा परिसरात व तालुक्यात पशुपालन व्यवसाय जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी करीत आहे. कोंढा परिसरातील कोंढा, कोसरा, आकोट, सोमनाळा, विरली खंदाळ, मोखारा, पालोरा चौ., चिचाळ, भावड, सेंद्री खु., सेंद्री बु., या गावात घरोघरी गाय, म्हैस दूध उत्पादन करण्यासाठी पालनपोषण केले जाते. परिसरात गाय, म्हैस यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात अनेक पदविका पास नापास झालेले लोक तसेच बोगस पशुवैद्यकीय पदविका मिळविलेले लोक जनावरांची तपासणी करतात. तसेच आजारी गाय, म्हैस, बैल, शेळी व इतर पशुवर उपचार करून मनमानी फी उकळतात. बोगस डॉक्टरच्या उपचाराने अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. पण पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या घरी कृत्रिम रेतनची सोय उपलब्ध होण्यासाठी एक चांगला हेतू ठेवून गावातील दुग्ध पदविका मिळविलेल्या बेरोजगारांना काम मिळावे म्हणून कृत्रिम रेतनचे काम काही तरूणांना दिले. हे बेरोजगार कृत्रिम रेतनाच्या कामासोबत आजारी जनावरांवर उपचार करून मनमानी फी शेतकऱ्याकडून वसूल करतात. जनतेला पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, असे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत. बोगस डॉक्टरचा गोरखधंदा सध्या पवनी तालुक्यातील इतर गावातही सुरू आहे. याबाबत भेंडाळा येथे एका गाईचे वासरू काढताना गाईचा मृत्यू झाला यास बोगस डॉक्टर कारणीभूत होता, यासंबंधात पंचायत समिती पवनी येथे त्याची तक्रार झाली. पण त्या बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नाही. सध्या बोगस डॉक्टरनी जनावराच्या औषधी पुरवठा करण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. कोंढा परिसरात घरोघरी पशुधन वाढत असताना जोडधंदा म्हणून पशुचे पालनपोषण करून दुध काढणे सुरू आहे.पण बोगस डॉक्टरांनी जनावरांवर थातूरमातूर उपचार करून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. तरी गोपालक शेतकऱ्यांनी बोगस डॉक्टरकडून उपचार करू नये, तसेच पशुवैद्यकीय पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)