शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवी अधिकारी महसूल विभागाची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:55 IST

शासनाच्या विविध विभागात समन्वय साधण्याचे महत्वाचे काम महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागात काम करतांना विविध विषय हातळण्याचा अनुभव प्राप्त होत असतो, असे अनुभवप्राप्त अधिकारीच महसूल खात्याची ताकद आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : उपजिल्हाधिकारी उरकुडे यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या विविध विभागात समन्वय साधण्याचे महत्वाचे काम महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागात काम करतांना विविध विषय हातळण्याचा अनुभव प्राप्त होत असतो, असे अनुभवप्राप्त अधिकारीच महसूल खात्याची ताकद आहे. उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे यांनी निवडणूक शाखेत अतिशय उत्तम काम केले असून त्यांचा अनुभवाचा फायदा या पुढेही मिळत राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे हे नियत वयोमानानुसार ३१ मार्च रोजी निवृत्त झाले असून त्यांचा आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपवन संरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे, अधिक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे, शिल्पा सोनाले, अर्चना मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे व सर्व तहसिलदार उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, माणसाच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्याच्या कामात उमटत असते. विजय उरकुडे यांनी महसूल खात्याची उत्तम सेवा केली असून त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असाच आहे. निवडणूक शाखा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळून उरकुडे हे निवृत्त होत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिळत राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शाल, श्रीफळ व भेट वस्तु देऊन विजय उरकुडे यांचा सत्कार केला.सत्काराला उत्तर देतांना विजय उरकुडे म्हणाले, शासन सेवेत आल्यानंतर महसूल विभागाने आपल्याला ओळख दिली. या खात्याने खुप अनुभव दिले. शासनात खुप काही शिकता आल्याचा आनंद आहे. शासकीय सेवेत बरे वाईट असे अनेक अनुभव आले असले तरी चांगले अनुभव कायम स्मरणात राहीले आहेत. शासन सेवेत असंख्य चांगली माणसं भेटली असून विद्यमान जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या रुपाने अतिशय मनमिळावू व अनुभव संपन्न नेतृत्वात काम करण्याचे भाग्य लाभल्याचे उरकुडे म्हणाले.शासन सेवेत निवृत्ती अपरिहार्य असली तरी काही अधिकारी त्यांच्या कामामुळे कायम स्मरणात राहतात. त्यांचे अनुभव येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असतात. असेच व्यक्तीमत्व विजय उरकुडे असून त्यांच्या सोबत गेल्या अनेक वषार्पासून काम करतांना अनेक बाबी अनुभवायला मिळाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसिलदार गजेंद्र बालपांडे यांनी यावेळी आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.