शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:56 IST

लोकसभा निवडणुकींतर्गत भंडारा - गोंदिया मतदार क्षेत्रातून नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या प्रक्रियेत सोमवारी पहिल्याच दिवशी २० उमेदवारांनी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल केली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भुसारी उपस्थित होते.

ठळक मुद्देरणधुमाळी लोकसभेची : जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकींतर्गत भंडारा - गोंदिया मतदार क्षेत्रातून नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या प्रक्रियेत सोमवारी पहिल्याच दिवशी २० उमेदवारांनी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल केली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भुसारी उपस्थित होते.निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार नामनिर्देशनपत्रे २५ मार्च पर्यंत (सार्वजनिक सुटी व्यतिरीक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत स्विकारले जाणार आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. दरम्यान ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. भंडारा येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे वतीने निवडणूकीशी संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना पोलीस बहुउद्देशिय सभागृहात निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले.अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ मार्चनामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजतापर्यंत सादर करणे आवश्यक आहे. २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत नामनिर्देशन अर्ज स्विकारली जाणार आहेत. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी २५ हजार व अनुसूचित जाती - जमातीसाठी १२ हजार ५०० रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा शासकीय कोषागार येथे चालानद्वारे भरावी, धनादेश स्विकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चालान सादर करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकतात.