शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

सामान्य रुग्णालयात वाहनधारकांची ‘लूट’

By admin | Updated: April 11, 2015 00:27 IST

आपण सर्वसामान्य कुटुंबातील असाल व उपचारासाठी किंवा रूग्णाला भेटायला जिल्हा सामान्य रूग्णालयात वाहनाने जात असाल तर जाऊ नका.

प्रकरण सायकल स्टॅण्डचे : गोरगरिबांची लुबाडणूक तरीही रुग्णालय प्रशासन गप्पप्रशांत देसाई भंडाराआपण सर्वसामान्य कुटुंबातील असाल व उपचारासाठी किंवा रूग्णाला भेटायला जिल्हा सामान्य रूग्णालयात वाहनाने जात असाल तर जाऊ नका. कारण रूग्णालय प्रशासनाने सायकल स्टँडच्या नावावर रूग्णांची पर्यायाने त्यांच्या वाहनधारक नातेवाईकांची ‘लूट’ चालविली आहे. सामान्यांसाठी आधार ठरु पाहणारे हे रुग्णालय पिळवणूक करणारे ठरत आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयाने उपचारासाठी येणारे रूग्ण किंवा त्यांच्या वाहनधारक नातेवाईकांकडून सायकल स्टँडच्या नावाने बळजबरीने लूट सुरू केली आहे. शुल्क घेतात परंतु जबाबदारी नाकारतातखासगी संस्थेला सायकल स्टँडची जबाबदारी दिलेली आहे. मात्र, संस्थेने जे पावती बुक छापले त्यावर जिल्हा सामान्य रूग्णालय असे नमूद आहे. सोबतच वाहन चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहणार नाही, असे स्पष्टपणे पावतीवर नमूद आहे. संस्था जबाबदारी स्वीकारत नसल्यास सायकल स्टँडची गरज काय? दररोज शेकडो वाहनधारक रूग्णालयात येतात. त्यामुळे या संस्थेने काही गौडबंगाल केले तरी त्याची जबाबदारी रूग्णालयाची राहणार आहे. रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून रूग्णालय परिसरात अस्ताव्यस्त वाहने लावण्यात येत होती. त्यामुळे रूग्णवाहिका काढण्यात किंवा अन्य महत्त्वाची वाहने काढताना अडचणी निर्माण यायच्या. त्यावर नियंत्रणासाठी सायकल स्टँड सुरू करण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर होणाऱ्या रूग्णाच्या हेडसांडबाबत माहिती नाही, माहिती काढून सांगेल.- सुनीता बढेनिवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रूग्णालय भंडारा.