शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

स्वयंपाकघरातून भाज्यांची ‘एक्झिट’

By admin | Updated: July 5, 2014 23:23 IST

महागाईची झळ सामान्यांना बसत आहे. आजचे दर उद्या नाहीत आणि उद्याचे दर परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे.

कांद्यानेही रडविले : धान्याचे दरही आवाक्याबाहेर, गृहिणींचे बजेट कोलमडलेभंडारा : महागाईची झळ सामान्यांना बसत आहे. आजचे दर उद्या नाहीत आणि उद्याचे दर परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे. भंडारा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू आणि धान्य व कडधान्याचे भाव वधारले आहेत. साठेबाजीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.सरकारच्या आकडेवारीत लोकांना स्वारस्य नाही. त्यांना वस्तूंचे दर समजतात व शंभर रुपयात काल ज्या वस्तू येत होत्या, त्या आज येत नाहीत. त्याला आज जास्त पैसे मोजावे लागत आहेत, एवढेच ग्राहकांना समजते. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या भावांचा आलेख चढता आहे व ही महागाई कुठपर्यंत जाईल, या कल्पनेनेच सामान्य माणूस आज धास्तावलेला आहे. धान्य, कडधान्य, खाद्य तेल, भाज्या, दूध, चहा, साखर, गूळ यांचे भाव सतत वाढत आहेत व ते आणखी किती वाढणार आहेत, हे सांगता येणार नाही. डिझेलच्या वाढीव दरामुळे वाहतुकीचे दर वाढले आहेत. त्यामुळे जनतेला केंद्रातील नवीन सरकारने रडकुंडीस आणले आहे. आता अच्छे दिन केव्हा येणार याची प्रतीक्षा आहे. (नगर प्रतिनिधी)केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य वाढविल्याने सर्वच बाजारपेठेतील दर अचानक वाढले आहेत. भंडाऱ्याच्या ठोक बाजारातील भाव प्रति किलो २० रुपयांवर गेले. किरकोळ विक्रीमध्ये लाल कांदा २० रुपये तर पांढरा कांदा २५ रुपये आणि आलू २४ रुपये किलो आहे. लाल कांद्याचा कट्टा ४०० रुपये आणि पांढरा कांद्याचा कट्टा ५०० रुपये आहे. त्यात आणखी भाववाढ होऊ शकते, असे भंडारा भाजी बाजारातील आलू-कांदे व्यावसायिक बबलू पठाण यांनी सांगितले. निर्यात मूल्य वाढताच बाजारात आवक २५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दिवाळीपर्यंत कांदा खाली येण्याची शक्यता नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याची लागवड कमी झाली असून उत्पादन घटण्याची भीती आहे. लांबलेल्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कांदा शेतकरी आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडे आहे.