शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

वरठी, गोबरवाहीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:09 IST

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वरठीत कडकडीत बंद पाळण्यात आला तर लाखनीत टायर जाळून निषेध करण्यात आला.

ठळक मुद्दे‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद : ‘त्या’ निर्णयाच्या विरोधात भंडारा, साकोली, लाखनी, पवनीत रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वरठीत कडकडीत बंद पाळण्यात आला तर लाखनीत टायर जाळून निषेध करण्यात आला. भंडारा, साकोली, पवनी, लाखांदूर, मोहाडी, तुमसर येथे दुचाकी रॅली काढून निषेध करण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.भंडारा शहरात भीम आर्मीसह सर्वपक्षीय प्रतिनिधींनी शास्त्री चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्र्यत दुचाकी रॅली काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्फत राष्टÑपती, प्रधानमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला निष्क्रीय व कमजोर करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भारत सरकार व राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करुन तज्ज्ञ वकीलाची नियुक्ती करावी, देशभरात सध्या एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार, अपमानास्पद वागणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी नियमावली तयार करुन भविष्यात असे प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, गुजरातमध्ये एका दलित मुलाने घोडा खरेदी करुन त्यावर बसुन जात असल्यामुळे त्याची निर्घुण हत्या केली. ही घटना काळीमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध करुन आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या आदेशावर दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकीलांना वेळीच व अनुकूल माहिती पुरवून या प्रकरणात सक्रीय व्हावे, कोरेगावभिमा प्रकरणातील दोषींना अटक करुन त्यांच्याविरुध्द प्रकरण न्यायालयात दाखल करावे आदी मागण्यांचा समावेश होता.या शिष्टमंडळात भीमआर्मीचे अध्यक्ष आनंद गजभिये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीचे सचिव प्रशांत सुर्यवंशी, भिम आर्मीचे जिल्हा सचिव संजय शिंगाडे, तालुका अध्यक्ष स्नेहल मेश्राम, काँगेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड, बसपाच्या पायल सतदेवे, रिपाईचे असित बागडे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे उपमहासचिव सुर्यभान हुमणे, बौध्द विहार ट्रस्टचे महादेव मेश्राम, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणजित कोल्हटकर, भिम आर्मीचे शहर अध्यक्ष सुरज भालाधरे, सचिन बागडे, संजय बन्सोड, नरेंद्र बन्सोड, चेतन शराबे, मंगेश मेश्राम, दिनेश गोस्वामी, सरद खोब्रागडे, राकेश बन्सोड, अमित उके, सुशिल नगरारे आदींचा समावेश होता.वरठीत स्वयंस्फूर्त बंदवरठी : वरठी येथे सकाळपासून व्यापारी प्रतिष्ठाणे आणि बाजार ओळीत कडकडीत बंद पाळण्यात आला. भंडारा-वरठी मार्गावर धावणाºया ३०० च्यावर आॅटोरिक्षा संघटनांनी बंद पाळल्यामुळे रेल्वेने आलेल्या प्रवाशांना भंडारा येथे जाण्यासाठी एसटीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे एसटीची वाट पाहत प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले होते. भीम आर्मीने भंडारा जिल्हा बंदची घोषणा केल्यानंतर पोलिसांना निवेदन देऊन व गावात आॅटोरिक्षा फिरवून बंदची माहिती देण्यात आली होती.वरठी येथे सकाळपासून बंद पळण्यात आला. गावात दवाखाने, शाळा व औषध दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद होती. वरठीत रेल्वे स्थानक असल्यामुळे प्रवासाची गर्दी होती. परंतु वरठीतून बाहेर जाण्यासाठी आॅटो रिक्षा नसल्यामुळे अनेकांना बंदचा फटका बसला. सनफ्लॅग गेटसमोर असणारी वर्दळ सकाळपासून सामसूम होती. दुकाने बंद असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य होते. गावात मोर्चा निघाला नसला तरी बंद १०० टक्के यशस्वी झाला. या बंदच्या पार्श्वभूमीवर वरठीतील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त होता.