शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत पक्षिगणनेत आढळले विविध जातीचे पक्षी

By admin | Updated: December 14, 2015 00:44 IST

स्थानिक कृष्णमुरारी कटकवार महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे १५ व्यावर्षी पक्षीगणना करण्यात आली.

ग्लोबल नेचर क्लबचा उपक्रम : १६०० हून अधिक पक्ष्यांचा समावेशसाकोली : स्थानिक कृष्णमुरारी कटकवार महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे १५ व्यावर्षी पक्षीगणना करण्यात आली. यात ५५ प्रकारचे १६०० पेक्षा जास्त पक्षी आढळले. या पक्षी दिन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार, प्रमुख अतिथी प्राचार्य प्रकाश मस्के, प्रा.क्रिष्णा बिसेन, पुष्पा बोरकर व जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने तसेच पक्षिमित्र सुनील गोसावी, कैलाश वलथरे, शुभम बघेल, बाळकृष्ण मेश्राम, पारस राऊत, यश भजे, पवन रामटेके हे होते. प्रा.अशोक गायधने, कलाशिक्षक दिनकर कालेजवार, सामाजिक कार्यकर्ते मंगेश चांगले यांनी विद्यार्थ्यांचे चार गटात विभाजन करून त्यांना दुर्मिळ पक्षी सारस, माळढोक, तणमोर व इंडीयन रॉबिन अशा दुर्मिळ पक्ष्यांची नावे देऊन त्यांनी पूर्व साकोली, दक्षिण साकोली, उत्तर साकोली व पश्चिम साकोली या भागात पक्षिगणना केली. शालेय व नवतळा परिसरात प्रा. अशोक गायधने, दिनकर कालेजवार व मंगेश चांगले यांच्या मार्गदर्शनात ३० विद्यार्थ्यांच्या तणमोर गटाने ३७ प्रकारचे ७५० पेक्षा जास्त पक्षी नोंदविले. दक्षिण साकोली गाव तलाव गडकुंभली रोड परिसरात सारस पक्ष्यांच्या गटाने २२ प्रकारचे ५०० पेक्षा जास्त पक्ष्यांची गणना सुनील गोसावी व प्रथम दुबे या पक्षी निरीक्षकांच्या मार्गदर्शनात २५ विद्यार्थ्यांनी केली. उत्तर साकोली, पिंडकेपार रोड व बाजार परिसरात पारस राऊत, बाळकृष्ण मेश्राम, यश भजे, पवन रामटेके या पक्षीमित्रांच्या मार्गदर्शनात १५ विद्यार्थ्यांनी २७ प्रकारचे २७० पक्ष्यांची गणना केली. नर्सरी पहाडी, नर्सरी कॉलनी परिसरात १५ प्रकारचे १३५ पेक्षा जास्त पक्ष्यांची गणना पक्षिमित्र कैलाश वलथरे व शुभम बघेल यांच्या रॉबिन गटातर्फे करण्यात आली. चारही गट विद्यालयात एकत्र आल्यानंतर पक्षिगणना अहवाल डॉ.सलीम अली यांच्या प्रतिमेसमोर व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात सादर करून डॉ.सलीम अली यांना प्रत्यक्षरित्या उपक्रम राबवून आदरांजली वाहण्यात आली. पक्षीगणनेचा तणमोर गटाचा अहवाल ज्ञानेश्वरी निंबेकर, सारस गटाचा अहवाल प्रथम दुबे, माळढोक गटाचा अहवाल हर्षल राखडे तर इंडीयन रॉबिन गटाचा अहवाल शीतल लांजेवारने सादर केला. प्रास्ताविक प्रा.अशोक गायधने यांनी करून पक्ष्यांचे साकोलीतील अधिवास नष्ट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. संचालन प्रथम दुबे याने तर आभार प्रदर्शन पुष्पा बोरकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)