शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅन झाडावर आदळली एक ठार

By admin | Updated: December 25, 2014 23:27 IST

एक्सप्लोसीव्ह व्हॅनमधील बारुद खाली करुन परत जात असतांना व्हॅनचा टायर फुटल्याने व्हॅन झाडाला आदळली यात चालक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज

व्हॅनमध्ये बारुद नव्हती : सराटी फाट्यानजीकची घटनासाकोली : एक्सप्लोसीव्ह व्हॅनमधील बारुद खाली करुन परत जात असतांना व्हॅनचा टायर फुटल्याने व्हॅन झाडाला आदळली यात चालक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साकोलीपासून चार किमी अंतरावरील सराटी फाट्यानजीक महामार्गाच्या बाजुला घडली. दुर्गेश निशाद (२५) रा. नवापरा छत्तीसगढ असे मृत चालकाचे नाव असून शिवशंकर रामाजी धुरु (२५) रा. तरंगा भाटापारा असे जखमीचे नाव आहे. एक्सप्लोसीव व्हॅन क्रमांक सीजी ०४ जेडी ८१६५ ही भंडाऱ्याकडून रायपूरकडे जात असतांना सराटीफाट्याजवळ व्हॅनचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व व्हॅन बाजुच्या झाडाला जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की व्हॅनची धडक झाडाच्या बुध्याला लागली. मात्र झाड वरच्या भागातून तुटून पडले. एवढेच नाही तर या धडकेनंतर व्हॅन बाजुच्या नाल्यात गेली. त्यामुळे व्हॅन समोरुन पुर्णपणे चेंदामेंदा झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस ताफा घटनास्थळी पोहचला तेव्हा या चेंदामेंदा व्हॅनमध्ये चालक व दुसरा इसम फसलेले होते. पोलिसांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर चालकाला कसेबसे बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याने जगाचा निरोप घेतला होता. तर शिवशंकर धुरु यांचेवर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार सुरु आहेत. मात्र ही व्हॅन कुठून कुठे गेली होती. याची नेमकी माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. तर व्हॅनमध्ये बारुद नव्हते. पुढील तपास पोलिस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)