शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन दिवसांत ३३ हजार ६६८ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या गावांसाठी सोमवार व मंगळवारी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसांच्या मोहिमेत १६ हजार ५५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. २१ जून रोजी ८३१८ नागरिकांनी लस घेतली. यात ७६१६ नागरिकांनी पहिला, तर ७०२  नागरिकांनी दुसरा डोस घेतला. २२ जून रोजी १८ ते ४४ वयोगटातील २६४९, तर ४५ वर्षांवरील ५५८६ अशा एकूण ८२३५ नागरिकांनी लस घेतली.

ठळक मुद्देप्रशासनाचा पुढाकार : लसीकरणात तरुण आघाडीवर, ग्रामीणमध्ये प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी राबिवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तीन दिवसांत जिल्ह्यातील ३३ हजार ६६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचाही विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१ जून रोजी ८३१८, २२ जून  रोजी ८२३५ आणि २३ जून रोजी १७ हजार ११५ नागरिकांना लस देण्यात आली.लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या गावांसाठी सोमवार व मंगळवारी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसांच्या मोहिमेत १६ हजार ५५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. २१ जून रोजी ८३१८ नागरिकांनी लस घेतली. यात ७६१६ नागरिकांनी पहिला, तर ७०२  नागरिकांनी दुसरा डोस घेतला. २२ जून रोजी १८ ते ४४ वयोगटातील २६४९, तर ४५ वर्षांवरील ५५८६ अशा एकूण ८२३५ नागरिकांनी लस घेतली. यात ७५१२ नागरिकांनी पहिला डोस, तर ६६३ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला.२३ जून रोजी जिल्ह्यात १७ हजार ११५ नागरिकांनी लस घेतली. यात १८ ते ४४ वयोगटातील १६ हजार २६८ व ४५ वर्षांवरील ८४७ नागरिकांचा समावेश आहे. १६ हजार ५५८ व्यक्तींनी पहिला, तर ५५७ व्यक्तींनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. यात ८७२३ पुरुष, तर ८३९२ महिला आहेत. १८ वर्षांवरील नागरिकांचे जिल्हाभरात विविध केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. लाभार्थ्यांनी गर्दी न करता व कोविड नियमांचे पालन करून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व समन्वयक डॉ. माधुरी माथूरकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात १६ कोरोनामुक्त ९ पॉझिटिव्ह 

भंडारा जिल्ह्यात गुरुवारी १६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ७९ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण असून मृत्यूची नोंद झाली नाही. रुग्ण संख्या वेगाने कमी होत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळत आहे. गुरुवारी ५३५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात एक, मोहाडी व साकोली येथे प्रत्येकी तीन तर लाखांदूर तालुक्यात दोन पॉझिटिव्ह आढळून आले. तर १६ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख १२ हजार ६५७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ४५५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. 

रुग्ण संख्या घटताच बाजारात गर्दी - गत १५ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. तर दुसरीकडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. भाजी बाजारासह मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे चित्र सकाळ-सायंकाळ दिसून येत आहे. अनेक जण तर मास्क न लावता बाजारात फिरताना दिसून येतात.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या