शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

‘युजलेस’ अन् ‘गेटआऊट’

By admin | Updated: August 29, 2015 00:50 IST

‘प्रत्येक क्रियेला एक समान आणि उलट प्रतिक्रिया आहे’, असे न्यूटनचा सिद्धांत सांगतो.

प्रासंगिक-नंदू परसावार‘प्रत्येक क्रियेला एक समान आणि उलट प्रतिक्रिया आहे’, असे न्यूटनचा सिद्धांत सांगतो. क्रिया एकापासून घडली आणि प्रतिक्रिया दुसऱ्याने दिली. नेमके हेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यात गुरुवारला दुपारी घडले. जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्यात गुरुवारला वाद उफाळून आला असला तरी या वादाची कारणे काही महिन्यांपूर्वीपासूनच खदखदत होती. गुरुवारी ती जनतेसमोर आली. भारतीय दंड संहितेतील कलम १०७ शांतता व सुव्यवस्था राखणे, १०९ सराईत गुन्हेगारांकडून तारणपत्र घेणे, ११० सराईत गुन्हेगारांकडून चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी बाँड लिहून घेणे हे अधिकार उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार खारीज करण्याचे आदेश काढले. या आदेशाचे सहपत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी हे अधिकार केवळ राज्य शासन आणि उच्च न्यायालयाला असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिउत्तर पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आदेशाचे सहपत्र पाठविले होते, त्या सर्वच अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी सहपत्र पाठवून जशास तसे उत्तर दिले. तेव्हापासून या दोन अधिकाऱ्यांमध्ये अधिकाराला घेऊन हा अंतर्गत वाद धुमसत होता. या वादाचा गुरुवारला स्फोट झाला.महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या घेऊन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी त्यांना आदरातिथ्याने कक्षात नेले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत महसूल विभागाचे काही अधिकारी होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना फैलावर घेत ‘यु आर नॉट वर्किंग प्रापरली, ‘व्हॉय? युवर आॅफिसर नॉट टेकिंग अ‍ॅक्शन इमिजिएटली’ ‘लिसन, मिस्टर एसपी आणि शेवटी ‘युजलेस’ आणि ‘यु आर नॉट आयपीएस’ असा प्रश्नांचा भडिमार सुरू असताना पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना गेट आऊट म्हणाले. वरिष्ठ अधिकारीच एकमेकांना न जुमानणारे असले तर सामान्यांच्या समस्या आणि सुरक्षेचा प्रश्न कोण मार्गी लावणार?आता या वादाला घेऊन महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. काही संघटनांनी पत्रके काढून पोलीस अधीक्षकांनी माफी मागावी, काहींनी निषेधाचे फलक लावले. त्यामुळे या दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या भांडणात जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न ताटकळत राहतील त्याचे काय? जिल्ह्यातील शेकडो शासकीय कार्यालयात दररोज हजारो लोक कामे घेऊन जातात. शुक्रवारलाही कामे घेऊन गेलेल्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागले. हा वाद असाच सुरू राहिला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, स्वाभाविक आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना संयम बाळगण्याची गरज आहे.दरम्यान, रंजित चव्हाण नामक एक तरुण महत्त्वाच्या कागदपत्रासाठी शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात येरझारा घालत होता. त्याला दिल्लीला जायचे होते. अखेर कागदपत्र न मिळाल्यामुळे त्याचे उद्याचे काम होऊ शकणार नाही. रंजित हे प्रातिनिधिक स्वरुप असले तरी त्याच्यासारख्या अनेकांची कामे आज होऊ शकली नाहीत. आता हा वाद किती दिवस चालणार आणि जनता किती दिवस होरपळणार, हे आता कळेलच.लोकप्रतिनिधी गेले कुठे?दोन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, ही बाब सामान्यजनांना ठाऊक नसली तरी लोकप्रतिनिधींना मात्र निश्चितच ठाऊक होती. ज्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याची धुरा सांभाळायची आहे, त्यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. शासकीय कार्यालयात जी कामे अधिकाऱ्यांकडून होत नाहीत, त्यावेळी लोकप्रतिनिधींना दखल घ्यावी लागते. उद्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील जी कामे रखडणार आहेत, ती सुरळीत करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.