शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलात लाकडी गिट्टीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:43 IST

देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकामात रिकाम्या पोकळीत पॅकींगकरिता लाकडी गिट्टीचा आधार देण्यात आला आहे. हजारो टनाचे वजन एक लाकडी गिट्टी सहन करीत आहे. हा कुतुहलाचा विषय आहे. पॅकींग केल्यावरही पावसाळ्यात पोकळीतून पाण्यासह फ्लाय अ‍ॅश रस्त्यावर आली होती. दगडाच्या वजनाने गिट्टी तुटली तर दगड निश्चितच आपली जागा सोडणार आहेत. नेमकी तांत्रिक कारणांकरिता गिट्टीचा उपयोग केला जातो काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देदेव्हाडीतील प्रकार : कुतुहलचा विषय, दगडी भिंतीतील पोकळी

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकामात रिकाम्या पोकळीत पॅकींगकरिता लाकडी गिट्टीचा आधार देण्यात आला आहे. हजारो टनाचे वजन एक लाकडी गिट्टी सहन करीत आहे. हा कुतुहलाचा विषय आहे. पॅकींग केल्यावरही पावसाळ्यात पोकळीतून पाण्यासह फ्लाय अ‍ॅश रस्त्यावर आली होती. दगडाच्या वजनाने गिट्टी तुटली तर दगड निश्चितच आपली जागा सोडणार आहेत. नेमकी तांत्रिक कारणांकरिता गिट्टीचा उपयोग केला जातो काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी रेल्वे क्रॉसिंग ५३२ वर रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सुमारे २४ कोटींचा हा उड्डाणपूल आहे. सध्या दोन्ही बाजूला अ‍ॅप्रोच पूलाचे बांधकाम सुरू आहे. फ्लाय अ‍ॅश भरावात घालण्यापूर्वी पूलाला दगडी भिंतीचे बांधकाम करणे सुरू आहे. एकावर एक असे दगड ठेवण्यात येतात. प्रत्येक दगडांचे वजन काही टनांचे आहे. सदर दगड भरीव सिमेंट काँक्रीटचे आहे. दोन्ही बाजूंच्या दगडाला एका मजबुत पट्ट्यांनी बांधले जाते. दगड एकमेकावर ठेवल्यानंतर गॅप राहते. जिथे राहत नाही तिथे दगडाला हलके फोडण्यात येते. गॅपमध्ये लाकडी गिट्टी फिक्स केली जाते.गिट्टी ही प्रत्येक दगडाला पॅकींग केली आहे. गिट्टीचा लाकूड हा सर्वसाधारण आहे. गिट्टी फिक्स केल्यानंतर काही दिवसांनी ती निश्चितच बाहेर पडणार आहे. काही ठिकाणी सध्या ती नाही. घट्ट पकडीकरीता गिट्टीचा वापर होतो काय, पोकळी गिट्टीमुळे बंद झाली तर पावसाळ्यात पाण्यासह फ्लाय अ‍ॅश रस्त्यावर कसे आले, हा मुख्य विषय येथे उपस्थित होत आहे.विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात लाकडांचा अथवा लाकडी वस्तुंचा वापर हद्दपार झाला. लाकडाला दुसरे पर्याय नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेकडो टन दगडांचा वजन आहे. फ्लाय अ‍ॅशचा रेटा निश्चितच दगडांना बसणार आहे. उड्डाणपूलावरून शेकडो टन वजनाचे ट्रक धावणार आहेत. त्यामुळे गिट्टीच्या वापरावर प्रश्नचिन्ह येथे उपस्थित होत आहे. 'उंटाच्या तोंडात जिरा' असाच हा प्रकार येथे दिसत आहे. येथून ये-जा करणारे निश्चितच कुतुहलाने सदर गिट्टीकडे पाहतात.