शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:58 IST

संपूर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही भंडारा शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अ‍ॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश दिसत नसल्याने सर्वत्र प्लास्टिक कचरा बोकाळला आहे.

ठळक मुद्दे‘युझ अ‍ॅण्ड थ्रो’ची सवय : अनिर्बंध वापरावर अंकुश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही भंडारा शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अ‍ॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश दिसत नसल्याने सर्वत्र प्लास्टिक कचरा बोकाळला आहे.शासनाने १ नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना ही बंदी आहे. मात्र सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. बाजारात ग्राहक सर्रास प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात. प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासनाने त्यावर बंदी आणली. परंतु त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आले नाही.वजनाने हलक्या असल्याने प्लास्टिक पिशव्या हवेबरोबर वाहत जावून पाणीसाठे, जंगल आणि जमीनीवर साचतात. मोकाट जनावरे, जलचर प्राणी अन्न समजून या प्लास्टिक पिशव्या गिळतात. आतड्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यामुळे गटारे कोंबून पाणी साचते. डबके निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिकमधील पॉलीमर्स जमीन, पाणी व अन्नसाखळी दुषीत करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक बाब आहे. त्यासाठी प्लास्टिक पिशव्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.प्लास्टिकच्या अतिवापराने आज विविध समस्या निर्माण झाल्या आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वन्य प्राणी आहेत. हे प्राणी प्लास्टिकच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. वन्यप्राण्यांनी प्लास्टिक भक्ष्यण केले तर त्यांनाही धोका होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने ठरविले तर प्लास्टिकपासून मुक्ती मिळू शकते यासाठी जनजागृतीची गरज आहे. यासोबतच कायद्याची अमंलबजावणी कडक करण्याची गरज आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास येथील पर्यावरण प्रेमी वसुंधरा फाळके यांनी केला आहे. यात त्यांनी प्लास्टिकमुळे होणाºया दुष्परिणामावर प्रकाश टाकला. प्रत्येक नागरिकाने जागरुक राहून प्लास्टिकचा वापर टाळल्यास पर्यावरणाची होणारी हानी टाळता येऊ शकते.प्लास्टिक हे नाशवंत नाही. त्याचे विघटन होत नाही. याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होती. त्यासाठी प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.-वसुंधरा फाळके,पर्यावरण अभ्यासक, भंडारा

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी