शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वनविभागाच्या जागेतील खड्डे बुजविण्याकरिता राखेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

काटेबाम्हणी - टाकला शिवारातील आंधळगाव उपवन कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या जागेतील मुरूम खोदलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याकरिता एका वीज कंपनीतील टाकाऊ राखेचा वापर करून खड्डे बुजवित असल्याने जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेती सिंचनापासून वंचित केल्याचा प्रकार घडत आहे. दुसरीकडे काटेबाम्हणी-टाकला शिवारात असलेल्या वनविभागाच्या जागेलगत आंतरराज्यीय प्रकल्प  असलेल्या बावनथडी प्रकल्पाचा कालवा गेलेला आहे.

संजय मतेलाेकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : आंधळगाव उपविभाग क्षेत्र कार्यालय व मोहाडी तालुक्यातील टाकला ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यालगत गट क्रमांक २४७ च्या वनजागेतील खड्डे बुजविण्याकरिता चक्क एका वीज कंपनीतील राखेचा भरणा करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.  बाब अंगलट येणार असल्याने कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी व टाकला ग्राम पंचायतीचे पदाधिकारी आणि सचिव यांच्यातील आर्थिक साटेलोटेमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे  खुद्द वनविभागाने ट्रक व जेसीबी ताब्यात घेतले आहेत.काटेबाम्हणी - टाकला शिवारातील आंधळगाव उपवन कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या जागेतील मुरूम खोदलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याकरिता एका वीज कंपनीतील टाकाऊ राखेचा वापर करून खड्डे बुजवित असल्याने जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेती सिंचनापासून वंचित केल्याचा प्रकार घडत आहे. दुसरीकडे काटेबाम्हणी-टाकला शिवारात असलेल्या वनविभागाच्या जागेलगत आंतरराज्यीय प्रकल्प  असलेल्या बावनथडी प्रकल्पाचा कालवा गेलेला आहे. कालव्यालगत असलेल्या खड्डयात राख घातली जात आहे. राख हवेद्वारा उडून कालव्यातील वाहत्या पाण्यात मिसळून जात असल्याने  पाणीसुद्धा दूषित होत आहे.  वन विभागाची  परवानगी नसताना ग्रामपंचायतीने वीज कंपनीतील कंत्राटदार  यांना ग्रामपंचायतीचे ठराव व नाहरकत प्रमाणपत्र देऊन वन विभागाच्या जमिनीवर राख टाकून जेसीपीच्या साहाय्याने सपाटीकरण केले आहे. परिणामी टाकला ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जंगलात झाडे लावण्याऐवजी महसूल विभागाच्या जागेवर राख टाकण्यात आली ही गंभीर बाब आहे. राख टाकण्यास कोणी पुढाकार घेतला व ती राख वन विभाग काढणार काय, यामध्ये दोषी असणाऱ्यांवर काही कारवाई  होईल काय?, असे  अनेक प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे. 

जमिनीवर मोठे खड्डे पडल्याने ही जागा पडीत होती. युवकांच्या मागणीनुसार खड्डे बुजवून पटांगण करून देण्याची मागणी होती.  कोणत्याही प्रकाराची हानी होणार नाही, या हेतूने खड्डे बुजविले असावेत.- रामदयाल बिसने, सरपंच टाकलावन विभागाच्या २४७ या गटामध्ये ग्रामपंचायतीने वीज कंपनीतील एका ठेकेदाराकडून वन विभागाच्या जागेवर राख टाकल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यासंबंधाने  चौकशी सुरू आहे. - केशव राठोड, वनक्षेत्राधिकारी, कांद्री

 

टॅग्स :forest departmentवनविभाग