शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय बांधकामात फ्लायअ‍ॅश विटांचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:58 IST

शासकीय बांधकामात फ्लायअ‍ॅश विटांचाच वापर करावा, असा शासन आदेश असून या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व कार्यालयांना पत्र देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : मोहाडीच्या पाणी पुरवठा व मलनि:स्सारणाच्या आराखड्याचे निर्देश

आॅनलाईन लोकमतभंडारा : शासकीय बांधकामात फ्लायअ‍ॅश विटांचाच वापर करावा, असा शासन आदेश असून या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व कार्यालयांना पत्र देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार रामचंद्र अवसरे, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, नगराध्यक्ष सुनील मेंढे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, मनीषा दांडगे, उपनिबंधक मनोज देशकर, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.मोहाडी नगरपंचायत क्षेत्राचा पाणी पुरवठा व मलनिस्सारण विकास आराखडयाचे अंदाजपत्रक जीवन प्राधिकरणच्या मार्फत १५ दिवसात तयार करण्यात यावा, असे निर्देश ना. बावनकुळे यांनी दिले. केसलवाडा येथील पाणी पुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार केली. या प्रकरणाची क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. यासोबतच केसलवाडा येथील पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले.खुल्या जागेवर नागरिकांनी केलेले अतिक्रमाण ग्रामपंचायत अधिनियमानुसार कार्यवाही कराव्या अशा सूचना त्यांनी दिल्या. मौजा सातोना येथील जिल्हा परिषद तलावातील अतिक्रमण काढणे व दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून ३० लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सातोना तलावाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना ना. बावनकुळे यांनी दिल्या. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना शासन सेवेत कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबत मंत्रालयस्तरावर २० मार्च रोजी बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.मोहाडीच्या आठवडी बाजारात शासकीय जागेवरील अतिक्रमण तसेच ढोरफोडीबाबत नगरपंचायत मुख्याधिकाºयांने १५ दिवसात कारवाई करून अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले. मानव वन्यप्राणी संघर्षात जखमी झालेल्या आत्माराम सार्वे यांना तात्काळ मदत देण्यात यावी. भंडारा पालिकेकडे आलेल्या अनुकंपा तत्वावरील अर्जदारास तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या देण्यात याव्या, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण केले. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद, शिक्षण, आदिवासी, महसूल, महावितरण, पालिका, वन विभागांचा समावेश आहे. नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे व त्यांच्या समस्या विहित मुदतीत सोडविल्या गेल्या पाहिजे यावर पालकमंत्र्यांनी भर दिला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकºयांच्या अर्जातील त्रृटया दुर करणे व नव्याने अर्जासाठी १०, ११ व १२ मार्च रोजी दसरा मैदान भंडारा येथे विशेष शिबिर घेण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या शिबिरात उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, बँकेचे अधिकारी उपस्थित राहतील. या शिबीरात कर्जमाफी संदर्भातील सर्व अडचणी सोडविण्यात येतील, असे पालकमंत्री यांनी सांगितले.