शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

बर्फगोळ्यात दूषित पाणी व रासायनिक रंगांचा वापर

By admin | Updated: April 6, 2015 00:47 IST

उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात.

आरोग्याशी खेळ : गोड चवीसाठी सॅकरीनचा वापर भंडारा : उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. ग्रामीण भागातील गावागावांत तसेच शहरी भागात बर्फगोळा विकणाऱ्या गाड्याची रेलचेल पहावयास मिळते. उन्हाची दाहकता उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठी मुलांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. परंतू बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखाण्यात बर्फाच्या निर्मितीकरिता दूषित पाणी उपयोगात घेऊन बर्फाची निर्मिती केली जाते. बर्फगोळा विकण्याऱ्या गाड्यांवरसुध्दा दूषित पाण्यापासून निर्मित बर्फ वापरत असल्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्फगोळ्याची निर्मिती करताना साखर ऐवजी साकरिनचा उपयोग करून त्यात रासायनिक रंगाचा वापर केला जातो. यामुळे मुलांच्या खाद्यात रासायनिक रंग उपयोगता आणल्या जात असल्याने घशाच्या आजारावरचे विकास मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची उदाहरणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील शाळा महाविद्यालये लग्न समारंभचा ठिकाणी आॅईस गोळा विकण्याची गर्दी अलीकडेच वाढतच आहे. बर्फ विकण्याऱ्या गाड्याजवळ शाळकरी मुल-मुली उष्णतेची दाहकता समवण्यासाठी आईस गोळा खान्याकडे आकर्षिले जात आहेत.बर्फगोळ्यात वापरल्या जाणाऱ्या रासायनीक रंग ही निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व त्याचा खाद्यपदार्थात वापर केल्यामुळे घशाचे विकार वाढल्याचे समोर येत आहेत. उन्हाळ्यात बर्फाचा सेवन करूनये असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञाकडून देण्यात येतो. पण उन्हाळ्यात उष्णतेमुळे तहान खूप लागत असल्यामुळे थंड पाणी मिळावे यासाठी बर्फाचा वापर केला जातो दुपारी १२ ते ४ या वेळात उन्हाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बर्फ गोळ्याचा गाडी जवळ लहान मुलांसोबतच मोठ्यांचीसुद्धा प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी अबालवृध्दांनी आईस्क्रीम पार्लर आॅइस गोळ्याचा गाड्या रसवंती गृह अशा ठिकाणाचा आधार घेतला आहे. शाळा-महाविद्यालयाचा परिसरात बर्फगोळ्याचा गाड्यावर बरीच मोठी गर्दी दिसू लागली आहे. ग्रामीण व शहरी भागात जागोजागी कलीगंडाचा गाड्या दिसू लागल्या असून मोबाईल रसवंत्या येणाऱ्या जाण्याऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या कलीगंड आणि काकडीचा बाजार तेजीत आला आहे. चौकाचौकात रसवंती, शरबत, लिंबू रस, लिंबू पाणी, आईसगोला, कुल्फीच्या गाड्याची संख्या बरीच वाढली आहे. परिणामी यावेळी लिंबूच्या मागणीत वाढ होत चालली असून लिंबाचा किमतीही वाढल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)