शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

उर्सला भाविकांची गर्दी उसळणार

By admin | Updated: May 25, 2014 23:22 IST

हिंदू मुस्लिम बांधवांच्या आस्था व एकात्मतेचे प्रतिक अशी तुमसर तालुक्यात आंबागडच्या हिरव्या गार वनश्रीने नटलेल्याबंदरझीरा येथील सैय्यद सिद्धीक शहा बाबा यांची दर्गा आहे. २६ मे रोजी येथे

भंडारा : हिंदू मुस्लिम बांधवांच्या आस्था व एकात्मतेचे प्रतिक अशी तुमसर तालुक्यात आंबागडच्या हिरव्या गार वनश्रीने नटलेल्याबंदरझीरा येथील सैय्यद सिद्धीक शहा बाबा यांची दर्गा आहे. २६ मे रोजी येथे उर्सनिमित्त १0 हजारावर भाविक हजेरी लावणार आहेत.

या संदर्भात जाणकार व ग्रीनहेरिटेचे संस्थापक अध्यक्ष सईद शेख यांच्या माहितीनुसार, ३00 वर्षापूर्वी या परिसरात हजारो एकर क्षेत्रात अत्यंत घनदाट जंगल होते. कुठेही पाण्याचे झरे व तलावांचा थांगपत्ता नव्हता. भयावह दुष्काळाच्यावेळी अचानक अरब येथून बाबा सिद्धीक शाह र.अ. यांचे येथे आगमन झाले. त्यांचो सोबत शिष्य बाबा बासगीर हे पण आले होते. येथील पर्वताच्या गुहेत राहून त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याण, सुख, समृद्धी, शांती व अमनकरिता प्रार्थना केली. फलस्वरुप संपूर्ण परिसरात खूप वर्ष होऊन आटलेले जलस्त्रोत वाहू लागले व सुख, समृद्धी, शांती, सद्भावनेची पहाट उगवून सगळीकडे नवचैतन्य निर्माण झाले. टेकडीच्या पटातून गोड पाण्याचा झरा सतत वाहू लागला. जिथे पशू पक्षी, जनावरे विशेषत: वानरांचे झुंडचे झुंड येथे पाणी प्यायला येत असल्यामुळेच या स्थळाचे नाव बंदरझिरा असे पडले.

दग्र्यावर दरवर्षी हिंदू, मुस्लीम भाविक एकत्रित येवून संपूर्ण मानवजातीचे कल्याण, शांती, समबृद्धी व अमनाची दुआ व प्रार्थना करतात. श्रद्धेने चादर अर्पण करतात.

नागपूरहून १0५ कि.मी. (व्हाया भंडारा - तुमसर - मिटेवान मार्ग) दूर आंबागड गावाशेजारी असून चालताना जंगलातील वनसौंदर्य व भव्य जलाशयचा ही भाविक आनंद लुटू शकतात. दूरदूरून भाविक येथे भेट देतात.

येथे भाविकांकरिता रस्ते, पाणी, विश्रामगृह, सभामंडप आदींची सोय नसल्याने भाविकांना त्रास होत असते. याकरिता प्रयत्न सुरु असून येथील सर्व व्यवस्था समस्त गाववासीयांतर्फे करण्यात येते. उद्या २६ मे (सोमवार)ला उर्स निमित्त भाविकांनी येथील महाप्रसाद (लंगरचा) लाभ घेण्याचे आवाहन समस्त गाववासीयांतर्फे करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)