शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना वृक्षतोडीचे प्रमाण वाढले

By admin | Updated: May 12, 2016 00:51 IST

काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे.

अड्याळ : काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. इंधन उपलब्ध नसल्याने सरपणाकरिता तसेच पहेला परिसरातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन गोसीखुर्द येथील धरणांतर्गत बाधित झाल्याने त्या शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी कंत्राटदारांना विकत आहेत.इमारतीचे लाकूड व फर्निचर बनविण्यासाठी जंगलातील बहुमुल्य वृक्षांची कत्तल होत आहे. भंडारा तालुक्यात वृक्ष लागवड ही अत्यल्प असल्याने वृक्षतोडीच्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. ५० वर्षांपूर्वी भंडारा तालुक्यात जळावू लाकडे मोठ्या प्रमाणात मिळत होती. आज ती मिळणे दुर्मिळ झाली आहेत. त्यात खापा, रावणवाडी, बोरगाव, एटेवाही, पागोरा, मिन्सी इत्यादी गावे जंगलात व्यापली आहेत. जंगलमाफिया, लाकूड ठेकेदार हे वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून वृक्षतोड करून पैसा कमावित आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडी वर करोडो रुपये खर्च करीत आहेत. परंतु पाहिजे त्या प्रमाणात वृक्ष उभे दिसत नाही. ते फक्त कागदोपत्रीच दिसत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जंगल क्षेत्रात भटकंती केली तर हजारो वाळलेले वृक्ष भुईसपाट झालेली दिसत आहेत. वृक्ष कटाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. आजस्थितीत जंगलावर उपजीविका करणारी आणि अवैध वृक्षतोड करणारी माणसे बेधडक जंगलाचे वाळवंट करीत असून वाळलेल्या लाकडासह नवीन झाडेही तोडू लागली आहेत. (वार्ताहर)