शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्रात प्रसूती करणे असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:58 IST

मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे.

ठळक मुद्देपरिचारिका दिन विशेष : डॉक्टरांअभावी परिचारिकांवर कामांचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ : मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे. शासनाचा हा निर्णय योग्य असला तरी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात असलेल्या असुविधा यासाठी कारणीभूत ठरत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध योजना राबवून हे काम करण्यात येत आहे. त्याद्वारे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यात काही प्रमाणात यश आले आहे. परंतु आरोग्य संस्थेतील आरोग्य उपकेंद्र आजही विविध समस्यांच्या विळख्यात आहेत.संपूर्ण ग्रामीण जनतेच्या आरोग्याची भिस्त ही आरोग्य उपकेंद्रावर अवलंबून असते. या उपकेंद्रात आरोग्यसेविका व आरोग्यसेवक एवढेच मनुष्यबळ असते. प्रसुतीचे काम एकट्या आरोग्य सेविकेवर असते. एका आरोग्य केंद्रांतर्गत ५ ते ८ उपकेंद्र असतात व एका उपकेंद्रात ३ ते ७ गावांचा समावेश असतो. उपकेंद्रापासून गावांचे अंतरसुध्दा २ ते ५ किमी असते. आरोग्यसेविका या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निर्देशाप्रमाणे विविध कामे करीत असतात. परंतु प्रसुती करताना आरोग्यसेविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रूग्ण रात्रीअपरात्री केव्हाही उपकेंद्रात येतात. त्यामुळे आरोग्यसेविकांना या समस्यांना तोंड द्यावे लागते.प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात अनेक घडामोडी घडतात. पंरतु रूग्णांची विश्वसनिय व्यक्ती म्हणजे आरोग्यसेविका जमेल त्या मार्गाने सुरक्षित प्रसुती कशी होईल, माता व बाळाचे आरोग्य कसे सुरक्षित राहील या विवंचनेत असते. प्रसुती होईपर्यंत तिचा जीवात जीव नसतो.सर्वस्व पणाला लावून प्रसुतीची प्रक्रिया ती हाताळत असली तरी हे सगळ करीत असताना आरोग्य सेविकेला कधी मातेला तर कधी बाळाला सुरक्षित हाताळताना केव्हा बिकट प्रसंग ओढवेल हे सांगता येत नाही. थोडासाही निष्काळजीपणा जीवावर बेतू शकते.प्रसुती दरम्यान अतिरक्तस्त्राव, झटके येणे, उच्च रक्तदाब, जंतूसंसर्ग यासारख्या समस्या उद्भवतात तर बाळाच्याबाबतीत कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, स्तनपान करण्यासाठी बाळ असक्षम असणे, उपजत मृत्यू व इतर वैगुण्य निर्माण होण्याची शक्यता असते. त्यावेळी आरोग्यसेविकेला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. याशिवाय अपुरा औषधसाठा, आॅक्सीजन सिलेंडरची अनुपलब्धता, इमर्जन्सी ड्रग्स डॉक्टरशिवाय हाताळण्याची परवानगी नसणे आदी बाबी आरोग्य सेविकेला अडचणीत आणतात. उपकेंद्रापासून आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालय व जिल्हा रूग्णालय लांब अंतरावर असल्याने रूग्णाला बऱ्याचदा संदर्भित केल्यावर रस्त्यामध्येच अनुचित घटना घडलेल्या आहेत. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत मिळत नाही. आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर असल्यामुळे तेही उपकेंद्रात सेवा देण्यासाठी असमर्थ ठरतात. रूग्णाला संदर्भित केल्यावर आरोग्य केंद्रात असलेली रूग्णवाहिका किंवा तालुकास्तरावर असलेली रूग्णवाहिका किंवा फिरती रूग्णवाहिकेच्या उपलब्धतेवर सुद्धा प्रसुतीपश्चात मातेला व नवजात बाळाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रसूतीचे पूर्व नियोजन असतांनाही अकाली प्रसुती व इतर संबंधीत समस्या उद्भवल्यास रूग्ण प्रथमत: उपकेंद्रात धाव घेत असतो त्यावेळीही आरोग्यसेविकेची तारांबळ उडत असते. कामाचा वाढता बोझा व आॅनलाईन कामे व मुख्यालय सोडून करावयाची कामे, कामाचे तास निश्चित नसणे यासह अन्य बाबी उपकेंद्रात प्रसुतीसाठी परिणामकारक ठरतात.