शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी महावितरणने केली वृक्षांची छटाई

By admin | Updated: July 8, 2017 00:33 IST

राज्य शासनाने ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे.

तीन तास वीज पुरवठा खंडित : गणेशपूर, विद्यानगर परिसरातील प्रकारप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण राज्य वृक्ष लागवडीत गुंतलेले असताना भंडारा शहरात महावितरणने शुक्रवारी विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या आल्याच्या कारणास्तव हिरव्या झाडांच्या फांद्यांची कत्तल केली. यासाठी महावितरणने विद्यानगर फिडरवरून सुमारे तीन तास विद्युत पुरवठा खंडित केला होता. वृक्षांच्या फांद्या छटाई किंवा वृक्ष कटाईची परवानगी वनविभागाकडून घेतलेली नाही, हे विशेष.वीज वितरण कंपनीच्या वतीने नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून आज ही वृक्ष छटाई करण्यात आल्याचे आता महावितरणकडून सांगण्यात येत आहे. वनविभागावर वृक्ष संवर्धन व लागवडीची जबाबदारी सोपविलेली आहे. राष्ट्रीय महामार्गावरसह गणेशपूर परिसरातील रस्त्यालगतच्या वृक्षांची कटाई व छटाई करण्यात आली. ही कामे महावितरणने पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते. मात्र, त्यांना आता ऐन पावसाळ्यात जाग आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कारधा उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. यावरून विद्यानगर येथील फिडरवरून गणेशपूर व विद्यानगर परिसरात वीजेचा पुरवठा नागरिकांना करण्यात आलेला आहे. दक्षिण क्षेत्रात मोडणाऱ्या हे कार्यक्षेत्र मागिल काही दिवसांपासून काही ना काही कारणाने वादग्रस्त राहत आहे. त्यात आणखी आज भर पडली. वृक्ष कटाई किंवा छटाईची वनविभागाला महाविरणने परवानगी मागितलेली नाही. विना परवानगी महाविरतणने आज सकाळपासूनच गणेशपूर येथील अखिल सभागृह परिसरातून ही वृक्ष कटाई व छटाई सुरू केली ती जिंदल पेट्रोलपंप पर्यंत केली. यासाठी महावितरणच्या दक्षिण क्षेत्राधिकाऱ्यांनी गणेशपूर ते विद्यानगर परिसरातील विद्युत पुरवठा सकाळी ७.३० वाजतापासून बंद केला तो सकाळी १०.३० पर्यंत. सध्या सकाळी ७ वाजताचे विद्युत भारनियमण बंद झाल्याने अनेकांना वाटले की, थोड्या वेळात विद्युत पुरवठा सुरळीत होईल. मात्र, आता म्हणता म्हणता तब्बल तीन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.दरम्यानच्या काळात दक्षिण क्षेत्राचे सहाय्यक अभियंता लिमजे यांनी चार मजूरांसह गणेशपूर ते राष्ट्रीय महामार्गावरील विद्यत तारांवरील वृक्षांच्या फांद्या तर काही ठिकाणी वृक्ष कटाई करण्याचा धडाका सुरू ठेवला होता. यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असताना तशी कुठलीही परवानगी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. सोबतच सदर काम करण्यात येत असल्याने वीज ग्राहकांना त्रास होईल, याची पूर्वसूचना नागरिकांना देणे गरजेचे होते. याबाबत महावितरणने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन नागरिकांना सुचीत करण्याच्या प्रकारालाही बाजूला ठेवून ही वृक्ष कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सहाय्यक अभियंता लिमजे यांना विचारणा केली असता, त्यांनी वनविभागाची परवानगी घेतली नाही, व वीज ग्राहकांना सूचना देण्याची गरज भासली नसल्याचे प्रतिक्रिया ‘लोकमत’ला दिली.