शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

युनिव्हर्सल फेरोचे ९०० कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

५० वर्षांपूर्वी कारखाना सुरु करण्यात आला होता. कारखान्याचे चार युनीट येथे कार्यरत होते. सुमारे तीन हजार कामगार येथे कामाला होते. सुरुवातीला १९९२ ते १९९६ दरम्यान कारखान्यावर ५२ कोटी वीज बिल थकीत होते. वीज मंडळाने वीज दरात सवलत दिली नाही. त्यामुळे १९ सप्टेंबर १९९६ ला कारखान्याची वीज खंडीत करण्यात आली.

ठळक मुद्देकारखाना बंदच : शेती परत करण्याची शेतकऱ्यांची मागणी, कामगारांचे जीवन झाले उद्ध्वस्त

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : युनिव्हर्सल फेरो हा मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना गत १५ वर्षांपासून बंद आहे. येथील ९०० कामगार देशोधडीला लागले आहेत. शासनाने २०० कोटी रुपयांचे वीज बिल माफ करूनही कारखाना सुरु झाला नाही. उलट कारखाना परिसरातील मॅग्नीज कारखानदाराने परस्पर विकण्याचा सपाटा लावला आहे. अशा परिस्थितीत ९०० कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे ४०० एकर शेती कारखानदाराने परत करावी, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.तुमसर तालुक्यात माडगी येथे युनिव्हर्सल फेरो हा मॅग्नीज शुद्धीकरणाचा कारखाना आहे. ५० वर्षांपूर्वी कारखाना सुरु करण्यात आला होता. कारखान्याचे चार युनीट येथे कार्यरत होते. सुमारे तीन हजार कामगार येथे कामाला होते. सुरुवातीला १९९२ ते १९९६ दरम्यान कारखान्यावर ५२ कोटी वीज बिल थकीत होते. वीज मंडळाने वीज दरात सवलत दिली नाही. त्यामुळे १९ सप्टेंबर १९९६ ला कारखान्याची वीज खंडीत करण्यात आली. २०१५ ते २०१८ या कालावधीत अभय योजनेंतर्गत २०० कोटी रुपये वीज बिल माफ केले. दरम्यान कारखानदाराने बिजली बोर्ड आॅफ इंडस्ट्रीयल फायनान्शीयल रिकन्स्ट्रक्शन (बीआयएफआर) याचिका दाखल केली.या दरम्यान कामगार संघटना न्यायालयात गेली. कारखान्याला ले-आॅफ मिळाला. यामुळे १ मार्च १९९७ ते मार्च १९९९ पर्यंत कामगारांना अर्धा पगार मिळाला. एप्रिल १९९९ पासून हा पगारही मिळणे बंद झाले. या काळात ७ एप्रिल १९९९ ला बीएफआर कारखाना व कामगार संघटनेला तीन महिन्याची स्थगिती मिळाली. स्थगिती दरम्यान कामगारांना स्वेच्छा निवृत्ती करारनामा २ जून १९९९ ला करण्यात आला. स्वेच्छा निवृत्ती घेतल्याशिवाय पगार मिळणार नाही असे सांगण्यात आले. मुद्रीत अर्जावर कामगारांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामगारात संभ्रम निर्माण झाला. गत २० वर्षात येथे शासनाने गंभीर दखल घेतली नाही. कामगार संघटना न्यायालयीन लढा देत आहे. कामगारांचे जीवन मात्र उद्ध्वस्त झाले आहे. येथील कामगार प्रतिनिधी रवींद्र गभणे, भास्कर झुरमुरे, हरिराम डहाळे, सरपंच गौरीशंकर पंचबुद्धे, माजी सरपंच कारू वहिले, संजय सेलोकर यांनी या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.४०० एकर जमीन पडूनकारखान्याने १९५६ रोजी शेतकºयांकडून पाच हजार रुपये दराने ४०० एकर शेती खरेदी केली होती. कारखाना बंद पडल्याने मौल्यवान शेती पडीक पडली आहे. कारखाना सुरु करा अथवा आमची शेती परत करा असा पवित्रा या परिसरातील शेतकºयांनी घेतला आहे. शेती कारखान्यात गेल्याने शेतकºयांवर मजूर म्हणून जीवन जगण्याची वेळ आली आहे.