शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

मृत्यूपूर्वी चिता रचण्याची दुर्दैवी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST

भंडारा : मृत्यू अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र काेराेनाचे मृत्युतांडव पाषाणहृदयी व्यक्तीलाही पाझर फाेडणारे आहे. दरराेज कुणाची ...

भंडारा : मृत्यू अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र काेराेनाचे मृत्युतांडव पाषाणहृदयी व्यक्तीलाही पाझर फाेडणारे आहे. दरराेज कुणाची ना कुणाची मृत्यूची वार्ता कानी पडते. काळजात चर्रर्र हाेते. सर्वसामान्यांची ही अवस्था तर काेविड स्मशानभूमीत गत वर्षभरापासून ६००वर अंत्यसंस्कार करणाऱ्यांचे काय? भंडारा येथील काेविड स्मशानभूमीत दरराेज २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. गत काही दिवसांत मृत्यूची संख्या वाढल्याने ॲडव्हान्समध्ये सरण रचून ठेवले जात आहे. काेराेनाने मृत्यूपूर्वी चिता रचून ठेवण्याची दुर्दैवी वेळ माणसांवर आणली आहे.

भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे तांडव सुरू आहे. दरराेज मृतांचा आकडा वाढत आहे. भंडारा शहरालगतच्या गिराेला स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत आहे. एक अंत्यसंस्कार उरकत नाही तर दुसरा तयार असताे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. माेजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत नगर परिषदेचे पाच कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. आता तर स्मशानभूमीत जागाही अपुरी पडू लागली. लगतचा परिसरही स्मशानभूमीसाठी घेण्यात आला. सुरुवातीला बांधलेले चाैदा ओटे कमी पडू लागल्याने आता थेट जमिनीवरच सरण रचले जाते. एकीकडे चिता धगधगत असताना दुसरीकडे सरणही रचले जाते. ऐनवेळी गाेंधळ उडू नये, कुणाला अंत्यसंस्कारासाठी फार वेळ ताटकळत राहू नये यासाठी आता ॲडव्हान्समध्ये सरण रचून ठेवले जाते.

गिराेलाच्या स्मशानभूमीत एका रांगेत रचून ठेवलेले सरण काेराेनाच्या भीषणतेची साक्ष देते. दरराेज दाेन ते तीन ट्रक लाकडे आणून स्मशानभूमीत ठेवली जातात. लाकडांचा खच कुणाच्याही काळजाचे पाणीपाणी केल्याशिवाय राहत नाही. अशा भीषण परिस्थितीत नगर परिषदेचे पाच कर्मचारी अहाेरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. ट्रकमधून लाकडे काढण्यापासून चिता रचण्यापर्यंत आणि कुणी नातेवाईक पुढे आले नाही तर भडाग्नी देईपर्यंत त्यांना साेपस्कार पार पाडावे लागतात. पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करताना या कर्मचाऱ्यांची काय अवस्था हाेत असेल आणि दरराेज मृत्यूचे तांडव अनुभवताना त्यांच्या मानसिकतेचे काय, असाही प्रश्न निर्माण हाेताे.

काेविड स्मशानभूमीत अभियंता प्रशांत गणवीर, मुकादम, रक्षित दहिवले, सीताराम बांते, जशपाल साेनेकर, संदीप हुमणे, राकेश वासनिक यांच्यासह राहुल देशमुख, संग्राम कटकवार, मुकेश शेंद्रे, मुकेश झाडे आदी नगर परिषदेचे कर्मचारी काेराेना मृतांवर अंत्यसंस्कारासह सर्व साेपस्कार पार पाडतात. अशा कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ही मंडळी काेराेनाग्रस्तांवर आपलेपणाने अंत्यसंस्कार करतात.

बाॅक्स

धगधगत्या चिता सांगतात काेराेनाचे भीषण वास्तव

काेविड स्मशानभूमी राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला या काेविड स्मशानभूमीतील धगधगत्या चिता दिसतात. काेराेनाचे काय वास्तव आहे हे या स्मशानभूमीत दिसते. गत काही दिवसांपासून तर स्मशानातील चितांची धग कमी झाली नाही उलट आता ॲडव्हान्समध्ये चिता रचून ठेवण्याची वेळ आली. काेराेना संसर्गातही बाहेर फिरून नियमाचा भंग करणाऱ्यांनी एकदा गिराेलाच्या स्मशानभूमीचे बाहेरून तरी स्मशानभूमीचे वास्तव अनुभवावे एवढीच माफक अपेक्षा.