शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार युवक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:53 IST

युवा बेरोजगारांना रोजगार मिळावे याकरिता जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या युवा बेरोजगार संघटनेच्या बॅनरखाली हजारो सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली.

ठळक मुद्देसुशिक्षीत बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : युवा बेरोजगारांना रोजगार मिळावे याकरिता जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या युवा बेरोजगार संघटनेच्या बॅनरखाली हजारो सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली.जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना व्हिडिओकॉन, अशोक लेलँड, सनफ्लॅग, अदानी येथे बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे, शासकीय व निमशासकीय कार्यालयात बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने काम द्यावे, मुद्रा लोन गरजू बेरोजगारांना द्यावे, औद्योगिकक्षेत्र वाढविण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर विध्यार्थ्यांना मानधन देण्यात यावे,भेल प्रकल्पग्रत शेतकरी मुलांना प्रमाणपत्र देण्यात यावे शासकीय रिक्त पदे भरावे, आदी मागण्या घेऊन बेरोजगार युवकांनी एल्गार पुकारला. बेरोजगारांच्या मोर्च्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. बेरोजगारांचा मोर्चा गुरुदत्त मंगल कार्यालयासमोरुन सुरु करण्यात अला.त्रिमुर्ती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोचार्चे सभेत रुपांतर झाले. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो बेरोजगार युवकांना संस्थापक बाळू चुन्ने, कल्याणी भुरे, किशोर पंचभाई, डॉ. अजय तुमसरे, तोमेश्वर पंचभाई, सुधन्वा चेटुले यांनी संबोधित केले. यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन देऊन लवकर मागण्या मंजुर करावे, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. संचालन प्रशांत घरडे यांनी प्रास्तावीक सुधन्वा चेटुले यांनी केले. आभार प्रकाश हेमने यांनी मानले.मोर्च्यासाठी डॉ.मोहन राऊत, नितीन तुमाने, नरेश करंजेकर, दिगांबर वंजारी, राकेश राऊत, गुणवंत दिघोरे, अक्षय रामटेके, ओमप्रकाश तिबुडे, शिलमंजू सिंव्हगडे, बाबुराव भिसे, ऋषी गोमासे, विजय देव्हारे, किरण सातव, दीपक चिमनकार, प्रमोद राऊत, राकेश राऊत, योगेश महावाडे किशोर बागमारे, रितेश झोडे, संदीप राऊत आदींनी प्रयत्न केले. या मोर्चात जिल्हाभरातुन शेकडो युवक सहभागी झाले होते.