स्टेशन टोली परिसरातील नागरिकांना बसणार फटका
तुमसर: देव्हाडी येथे तीरो डी रेल्वे ट्रॅकजवळ अंडरपास पूल बांधकाम नियोजित होते. परंतु आता रेल्वेने त्या स्थळात बदल केला असून आता उड्डाणपुलाजवळील तुमसर गोंदिया रेल्वे फाटकावर अंडरपास पुलाचे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे स्टेशनतोली येथील रेल्वे कॉलनी परिसरातील नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे.
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून लवकरच या पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. स्थानिक नागरिकांना जाण्याकरिता रेल्वे प्रशासन येथे अंडरपास पूल बांधकाम करणार आहे. यापूर्वी तिरोडी रेल्वे ट्रॅकजवळ हा अंडरपास पुलाचे बांधकाम करण्यात येणार होते. परंतु त्यानंतर रेल्वे प्रशासनाने अंडरपास पूल रद्द केला. त्याऐवजी तुमसर गोंदिया रस्त्यावर रेल्वे फाटकावर अंडरपास पूल बांधकाम बांधकामास मंजुरी दिल्याची माहिती आहे.
रेल्वेने स्थळात बदल केल्यामुळे स्टेशनटोली रेल्वे कॉलनी परिसरातील नागरिकांना फटका बसणार आहे. या परिसरातील नागरिक अंडरपास पुलातून बाहेर निघाल्यानंतर त्यांना आपल्या घराकडे जाण्याकरिता रस्ताच राहणार नाही. त्यामुळे त्यांना गल्लीबोळातून जावे लागणार आहे. याच्या त्यांनी विरोध केला आहे. ती रोड रेल्वे ट्रॅक जवळ रेल्वेची सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित असल्याने त्या परिसरात अंडर पास पूल बांधकाम रद्द केले. काहींनी त्यास विरोध केला होता, अशी माहिती आहे.
बॉक्स
नागरिकांना मनस्ताप
स्टेशन पोलीस परिसरात मोठ्या प्रमाणात घरे आहेत. अंडरपास पूल रेल्वे केबिन रस्त्यावर तयार झाल्यास या परिसरातील नागरिकांना घरी जाण्याकरता मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे स्टेशनटोली परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. रेल्वे प्रशासनाने येथे स्थळात बदल करावा, अथवा स्टेशन परिसरात देण्याकरिता पर्यायी मार्ग रेल्वेने नागरिकांना तयार करून द्यावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.