शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या नावाखाली आता रेती चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 20:59 IST

शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विना रॉयल्टी देण्याचे आदेश दिले. मात्र शासनाच्या आदेशाच्या गैरफायदा घेत अनेकजण रेतीची तस्करी करीत आहेत. वाहन पकडल्यास एखाद्या घरकुल लाभार्थ्याचे नाव सांगुन पळवाट शोधत आहेत.

ठळक मुद्देधूळफेक : शासनाच्या आदेशाचा असाही गैरफायदा

मुखरु बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विना रॉयल्टी देण्याचे आदेश दिले. मात्र शासनाच्या आदेशाच्या गैरफायदा घेत अनेकजण रेतीची तस्करी करीत आहेत. वाहन पकडल्यास एखाद्या घरकुल लाभार्थ्याचे नाव सांगुन पळवाट शोधत आहेत. या प्रकाराने आता पुन्हा रेती तस्करीत राजरोसपणे वाढ झाली आहे.प्रधानमंत्री घरकुल योजनेसह विविध योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेकडो गोरगरीबांना घरकुल मंजूर झाले आहे. शासनाने निधीही उपलब्ध करुन दिला आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीची अडचण निर्माण झाली होती. घरकुलाचे बांधकाम ठप्प झाले होते. त्यामुळे विविध पातळीवर पाठपुरावा करण्यात आला. घरकुल लाभार्थ्यांना दोन ब्रास रेती मोफत देण्याचे आदेश देण्यात आले. तर मुख्यमंत्र्यांनी लोक संवाद कार्यक्रमातून पाच ब्रास विनारॉयल्टी रेती देणार असल्याचे सांगितले. शासनाच्या उद्देश चांगला असला तरी त्यातून कसा करता येईल, यााच शोध अनेकजन घेत असतात. या गोरगरीबांच्या रेतीआड तस्करांनी खुलेआम रेतीचोरी सुरु केली आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील घरकुल लाभार्थ्यांना पळसगाव (दिघोरी) घाटातून दोन ब्रास रेती उपसण्याची परवानगी आहे. यात ग्रामसेवकाचा परवानगीची आवश्यकता होती. मात्र प्रत्यक्षात गरजुंच्या घरी जावून चौकशी न झाल्याने रेतीची तस्करी वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक गावात आता अशा पध्दतीने रेतीची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे.चुलबंद खोऱ्यातील प्रत्येक रेती घाटावर ट्रॅक्टर बिनधास्तपणे रेतीची तस्करी करीत आहे.घाटांची तपासणी गरजेचीलाखनी तालुक्याला रेती, मुरुम व अन्य गौण खनिजांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. यातून शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसुल जमा होतो. परंतु अलीकडे स्थानीक रेती तस्कर खुलेआम रेती चोरी करीत आहेत. या सर्व घाटांची जिल्हाधिकाºयांनी तपासणी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sandवाळू