शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंदीमुळे रेतीचा डम्पिंग यार्डमध्ये अनधिकृत साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:01 IST

सिहोरा परिसरातील वैनगंगा, बावनथडी नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात अनधिकृत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहेत. कर्कापूर गावाचे शिवारात सर्वाधिक रेती खाजगी जागेत असताना यंत्रणेची कारवाई शून्य आहे.

ठळक मुद्देरेती विक्री अडली : खाजगी व शासकीय जागेत डम्पिंग, खाजगी जमीनधारकांवर गुन्हे नोंदवा

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील वैनगंगा, बावनथडी नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात अनधिकृत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहेत. कर्कापूर गावाचे शिवारात सर्वाधिक रेती खाजगी जागेत असताना यंत्रणेची कारवाई शून्य आहे.सिहोरा परिसरातील वैनगंगा, बावनथडी नद्यांचे खोºयात पात्रातून अवाठव्य रेतीचा उपसा सुरू आहे. नागपुर, मध्यप्रदेश आणि विदर्भातील अन्य जिल्ह्यात रेतीची मोठी मागणी असल्याने नद्यांचे काठावरील गावात रेती माफियांचा उदय झाला आहे. नदीचे पात्रातून दिवस रात्र रेतीचा उपसा केल्यानंतर गावाचे शेजारी असणाºयाशेत आणि गाव शिवारात खाजगी व शासकीय जागेत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहेत.यात वन आणि महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या व्यवसायात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय सेवेतील गाव स्तरावरील लोक रक्षक कर्मचारी आणि लहान मोठे व्यावसायिक गुंतले आहेत. अनेकांनी या व्यवसायात अधिक नफा असल्याचे कारणावरून मुळ व्यवसायाचे शटर बंद केली आहे.नगदी पीक याप्रमाणे रेती विक्री या व्यवसायाची गणना केली जात आहे. दिवस भर रेतीचा उपसा केल्यानंतर रात्री या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावर दिवस भर बोटावर मोजण्या इतपत ट्रक धावत असली तरी रात्री या ट्रकची गर्दी दिसत आहे. हरदोली गावाचे बस स्थानकावर राज्य मार्गावर रेतीची प्रतिक्षा करित असताना सायंकाळ सुमारास ७ ते ८ ट्रक रोज दिसून येत आहेत.या बस स्थानकावर रेतीचे माफिया या ट्रकची प्रतिक्षा करित आहेत. कर्कापूर गावाचे शिवारात या ट्रकला वळते करण्यात येत आहे. या दोन गावांचे शिवारात डम्पींग यार्डमध्ये ५०० ट्रक हून अधिक रेती आहे.खाजगी जागेत असणाºया या रेतीचे साठ्यावर जप्तीची कारवाई येत नाही. या शिवाय खाजगी जमीन धारकांचे विरोधात कारवाई केली जात नाही. पांजरा गावाचे घाटावरून ही रेती डम्पींगमध्ये आयात करण्यात येत आहे.दरम्यान नजिकचे राज्यात विधानसभा निवडणुकीने विदर्भातील बांधकाम प्रभावित झाले आहे. मजुर वर्गाने गावाकडे पलायन केल्याने रेती विक्रीवर बंदी आली असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नद्यांचे काठावरील गावे आणि शेजारी गावात रेतीचे ढीग दिसून येत आहेत. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर ओव्हरलोडेड रेतीचे ट्रक धावत आहेत.आधीच राज्य मार्ग खड्डेमय झाला आहे. पुन्हा या ट्रकनी यात भर घातली आहे. ओव्हरलोडेड ट्रकमुळे डबल धमाका लाभाचे चित्र माफियांना होत आहे. परंतु कारवाईचे नावावर आलबेल सुरू आहे.