शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृतपणे खोदकाम करणारी जेसीबी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:42 IST

आंतरराज्यीय सीमेवरील बपेरा गावात असणाऱ्या वन परिक्षेत्र कार्यालयाचे हद्दीत असणाऱ्या सोंड्या गावाचे शिवारात संरक्षित जंगलात अनधिकृत खोदकाम करताना जेसीबी मशिन आढळून आल्याने क्षेत्र सहाय्यकांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात राजस्थानचे इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबपेरा क्षेत्र सहायकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : आंतरराज्यीय सीमेवरील बपेरा गावात असणाऱ्या वन परिक्षेत्र कार्यालयाचे हद्दीत असणाऱ्या सोंड्या गावाचे शिवारात संरक्षित जंगलात अनधिकृत खोदकाम करताना जेसीबी मशिन आढळून आल्याने क्षेत्र सहाय्यकांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात राजस्थानचे इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिहोरा परिसरात वनाचे विस्तारीत क्षेत्र आहे. यात संरक्षित जंगलाचे वाढते ढिग आहे. या संरक्षित जंगलात नव्याने शेतशिवार तयार करण्यासाठी धुडगुस सुरु झाली आहे. संरक्षित जंगलात वाढते अतिक्रमण असल्याने जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलात वाढते अतिक्रमण असल्याने वन्य प्राण्यांचे मुक्त संचार धोक्यात आले आहे. बपेरा वन परिक्षेत्र कार्यालयाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. जंगलाचे रक्षण व मौल्यवान झाडाचे संगोपन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.आंतरराज्यीय सीमा याच वन विभागाचे नियंत्रणात ठेवण्यात आली आहे.या कार्यालयाचे अंतर्गत सोंड्या गावाचे बिट मध्ये वन आणि संरक्षित जंगलाचे क्षेत्र आहे. सोंड्या २ अंतर्गत कक्ष क्रमांक १० मधील संरक्षित वनात जेसीबी मशिनचे सहाय्याने खोदकाम करण्यात येत असल्याने वन रक्षकाला दिसून आले.जेसीबी मशीनने खोदकाम करताना मौल्यवान वृक्षाची नासधूस करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून अन्य प्रांतातील लोकांचे वास्तव्य या परिसरात आहे.रोजगाराकरिता त्यांचे वास्तव्य असले तरी शेतीविषयक कार्य करणारे उपकरण त्यांचे जवळ आहेत. नव्याने शेत शिवारांची दुरुस्ती कोणतीही सहानिशा न करता त्यांचे करवी करण्यात येत आहेत. संरक्षित जंगलाचे शेजारी अनधिकृत प्रवेश करीत जंगलातच जेसीबी ने खोदकाम करताना राजस्थानचे इसम दिसून आले.जेसीबी क्र. आर..जे. २१ ईए १०२७ ही मशिन आधी ताब्यात घेण्यात आली आहे. जेसीबी मालकाचे नाव बाबूराव चौधरी असे असून जि. जोधपूर (राजस्थान) असल्याची नोंद वन विभागाचे कार्यालयात करण्यात आली आहे. चुल्हाड बसस्थानक परिसरात भाड्यांचे घरात परप्रांतीय लोकांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली आहे.बपेराचे वनपरिक्षेत्र कार्यालयात ही जप्त करण्यात आलेली जेसीबी मशिन ताब्यात ठेवण्यात आली आहे. संरक्षित जंगलात अनधिकृत प्रवेश व वृक्षाची अवैध तोड केल्याप्रकरणी बपेरा क्षेत्र सहाय्यक कार्यालयात बाबूराव चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई क्षेत्र सहाय्यक जी.डी. मरस्कोल्हे आणि बिट रक्षक एन.एस. कुंभरे यांनी केली. सहाय्यक वन संरक्षक अधिकारी कोडापे व वन परिक्षेत्राधिकारी ए.आर. जोशी यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक मरस्कोल्हे तपास करीत आहेत.