मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जंगलव्याप्त आंबागड येथे अनधिकृतपणे दर आठवड्याला बैल बाजार भरत आहे. पूर्वी तो रामपूर येथे भरत होता. जिल्हा परिषद प्रशासनाने बैल बाजार भरविण्याची रितसर परवानगी दिली नाही. पोलीस प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. त्यांच्या आशिर्वादाशिवाय बैल बाजार भरविणे शक्य नाही. मध्यप्रदेशातील बैल येथे विक्री करिता येतात. खरेदी केलेले बैल कामठी तथा नागपूरकडे कत्तलखान्याकडे जातात, अशी माहिती आहे.तुसमर पासून १५ कि.मी. अंतरावर आंबागड गाव असून आंबागड शिवारात दिवाळीपासून अनधिकृत बैल बाजार भरीत आहे. दर आठवड्याला बुधवारी हा बाजार भरतो. पूर्वी हा बैल बाजार रामपूर येथे भरविला जात होता. तक्रारीनंतर हा बैल बाजार बंद करून जवळच्या आंबागड शिवारात भरविणे सुरु आहे. रामपूर येथील बैल बाजारही अनधिकृत होता. जंगलव्याप्त परिसर असल्याने प्रशासनाचे त्याकडे मुळीच लक्ष नाही. त्याचा फायदा येथे बैल बाजार भरविणारे घेत आहेत.कामठी व परिसरातील दलाल हा बैल बाजार भरवित आहेत. मध्यप्रदेशातील शेकडो बैल येथे विक्रीकरिता आणले जातात हे विशेष. जंगलव्याप्त मार्गाने त्यांची ने आण केली जाते. ट्रक, मिनी ट्रकमध्ये कोंबून निर्दयपणे या बैलांची वाहतूक केली जात आहे. म्हशी सुद्धा येथील बाजारात विक्री करीता आणल्या जातात. बैल बाजारातून या गुरांची रवानगी कामठी व परिसरात केली जाते. हिवरा बाजार तथा रामटेक मार्गाने या गुरांची वाहतूक सर्रास सुरु आहे. पोलिसांच्या भूमिकेवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने बैल बाजार भरून शकत नाही. दर बुधवारी शैकडो बैल व माणसं येथे जमा होतात. सर्रास हा बाजार अनधिकृतपणे भरविला जात आहे.
आंबागड शिवारात भरतो अनधिकृत बैल बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:14 IST
मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जंगलव्याप्त आंबागड येथे अनधिकृतपणे दर आठवड्याला बैल बाजार भरत आहे. पूर्वी तो रामपूर येथे भरत होता. जिल्हा परिषद प्रशासनाने बैल बाजार भरविण्याची रितसर परवानगी दिली नाही. पोलीस प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. त्यांच्या आशिर्वादाशिवाय बैल बाजार भरविणे शक्य नाही. मध्यप्रदेशातील बैल येथे विक्री करिता ...
आंबागड शिवारात भरतो अनधिकृत बैल बाजार
ठळक मुद्देरामपूरहून आंबागड येथे स्थलांतरीत : पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह