शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाच्या अटकेसाठी 'अल्टीमेटम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:11 IST

सहाव्या वर्गात शिकणाºया विद्यार्थीनींना मोबाईलद्वारे अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी घृणास्पद कृत्य करणाºया वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापकाचे निलंबन व अटकेसाठी तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन : अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन, शिक्षण सभापतींची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सहाव्या वर्गात शिकणाºया विद्यार्थीनींना मोबाईलद्वारे अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी घृणास्पद कृत्य करणाºया वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापकाचे निलंबन व अटकेसाठी तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. गोबरवाही पोलिसांना त्या मुख्याध्यापकाच्या अटकेसाठी २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अटक न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रसतर्फे पोलिस ठाण्यावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.तालुक्यातील गोबरवाही येथे मथराप्रसाद ईसरका जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत इय्यता सहावीचे वर्गशिक्षक तथा मुख्याध्यापक विजय दयाराम साठवणे हा मागील अनेक दिवसांपासून चिमुकल्या विद्यार्थीनींना मोबाईलमध्ये अश्लील चित्रपट दाखवून विद्यार्थीनींशी वर्गातच अश्लिल चाळे करत असल्याची तक्रार मुलींनी त्यांच्या पालकांकडे ९ एप्रिल रोजी केली असता पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीकडे धाव घेतली. त्यानुसार गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाºयांकडे दुसºया दिवसीच तक्रार दिली. त्यानुसार गटशिक्षणाधिकाºयांनी मौका तपासणी व सखोल चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या शिक्षकावर निलंबनसंबंधीचे अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालक संतुष्ट झाले होते. मात्र चौकशीच्या दहा बारा दिवसानंतरही सदर मुख्याध्यापकावर कोणतीच कारवाई न करता फेर तपासणी चौकशीसाठी सहायक बीडीओ शाळेत दाखल झाले. त्यामुळे अधिकारी राजकीय दबावापोटी मुख्याध्यापकाला वाचविण्याचा प्रयत्न करित असल्याचे लक्षात येताच प्रकरणाला वाच्चता मिळाली. लगेच दुसºया दिवसी सर्वप्रथम 'लोकमत'मध्ये बातमी झळकताच २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी शाळेला भेट देवून प्रकरणाची माहिती घेतली. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना त्या मुख्याध्यापकाचे निलंबन करण्यासंबंधीचे आदेश दिले असून उद्यापर्यंत निलंबनाचे आदेश पंचायत समितीकडे येणार असल्याची माहिती तुरकर यांनी दिली आहे. त्या मुख्याध्यापकाचे निलंबन ही शिक्षा नसून त्याला अटक करा, अशी मागणी महिला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षा कल्याणी भुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने लावून धरत गोबरवाही पोलिसांना २४ तासाचा अल्टीमेटम दिला. अन्यथा हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीच चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. शिष्टमंडळात कल्याणी भुरे, जिल्हा परिषद सदस्या संगिता सोनवाने, शाळा व्यवस्थापन समितीचे पायल लोणारकर, दिलीप सोनवाने, ईसराईल शेख, किशोर हुमणे, वामन गाढवे, लक्ष्मी हातझाडे, मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.सदर मुख्याध्यापक हा विकृत मनोवृत्तीचा आहे. यापूर्वी लाखांदूर, लाखनीमध्ये कार्यरत असताना विद्यार्थीनीशी असेच अश्लील चाळे केले असल्याचे सामोर आले आहे. त्यामुळे केवळ निलंबन हा पर्याय नसून त्याला अटक होवून कठोर शिक्षा व्हावी.-कल्याणी भुरे, जिल्हाध्यक्षा,महिला राष्ट्रवादी काँग्रेस.शिक्षणाचे धडे गिरविणाºया शिक्षकाकडूनच असले कृत्य म्हणजे संपूर्ण शिक्षण विभागाला काळीमा फासल्यासारखे आहे. अशा शिक्षकांची कुठलीही गय न करता तात्काळ कारवाई करण्यात येईल.-धनेंद्र तुरकर, शिक्षण सभापती, जि.प. भंडारा.