शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
नागपंचमी २०२५: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

'उज्ज्वला'च्या डोक्यावर पुन्हा लाकडाची मोळी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:33 IST

महागाईमुळे सिलिंडर परवडेना : केरोसीनही मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क किटाडी : कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. तो कधी मिळतो, तर कधी मिळतही नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. सध्या स्थितीत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही हजाराच्या आसपास राहिल्याने अनेक गोरगरिबांचे बजेट बिघडत चालले असल्याचे दिसून येत आहे. केरोसीनचा पर्याय आहे. पण ते केरोसीनही आता मिळत नाही. अशा स्थितीत गोरगरिबांची चूल पेटणार तरी कशी? असा मोठा ग्रहण प्रश्न आहे.

केंद्र शासनाकडून राशन दुकानावर मिळणारे केरोसीन बंद झाल्यानंतर विविध घटकांमध्ये सर्वसामान्य महिलांसाठी आरोग्याच्या प्रश्न समोर ठेवून "उज्ज्वला" योजना शासनाने आणली. त्याअंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. गॅस सिलिंडरचे अनेक वेळा दर वाढले. दर वाढल्यानंतर सबसिडी वाढायला हवी होती.

मात्र, तसे झाले नाही. हातावरील पोट असलेल्या कुटुंबांची गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमतीमुळे दमछाक होताना दिसून येत आहे. त्यामुळे असंख्य 'उज्ज्वला' योजनेतील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.

गॅस सिलिंडरच्या दरात तिपटीने वाढग्रामीण भागातील महिलांना जंगलातून लाकडे आणून स्वयंपाक करावा लागतो. यामुळे महिलांना धुरापासून त्रास होतो. यापासून मुक्त्तीसाठी शासनाने घराघरात विविध शासकीय योजनेतून गरीब कुटुंबांना निःशुल्क गॅसजोडणी देण्यात आली. मात्र, मागील काही वर्षांत गॅस सिलिंडरच्या दरात तिपटीने वाढ झाली. महागाईमुळे अनेक गरीब कुटुंबात गॅस सिलिंडर शोभेची वस्तू ठरत आहे. तिपटीने वाढलेले गॅसचे दर कमी करण्याची गरज आहे.

सिलिंडरवर मिळणारी सबसिडी अत्यल्पकेंद्र सरकारने वर्षात १२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सबसिडी बऱ्यापैकी मिळत होती. मात्र, ही सबसिडी टप्प्याटप्प्याने अत्यल्प करण्यात आली. त्यातच गोरगरिबांना गॅसच्या वाढत्या किमतीत सिलिंडर घेणे परवडत नाही. त्यामुळे 'बाई आपली चूलच बरी' असा सूर सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून उमटत आहे. खेड्यापाड्यातील महिला रानावनात जाऊन कोरडी लाकडे आणून त्यावर स्वयंपाक करून जेवण तयार करीत आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाbhandara-acभंडारा