शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यू-डायसमध्ये शाळेची माहिती चुकीची !

By admin | Updated: January 14, 2016 00:41 IST

शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांची माहिती एका क्लिकवर प्राप्त व्हावी, यासाठी यू-डायसमध्ये नोंदी घेतलेल्या आहेत.

भौतिक सुविधांची माहिती दडपली, तज्ज्ञांचे चुकीचे निर्देश, शिक्षण विभागाचा जावईशोधप्रशांत देसाई भंडाराशिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांची माहिती एका क्लिकवर प्राप्त व्हावी, यासाठी यू-डायसमध्ये नोंदी घेतलेल्या आहेत. राज्यातील एकही शाळा इमारत विरहीत नाही. त्यामुळे अत्री शाळेची माहिती भरताना तज्ज्ञांच्या सूचनेनुसार शाळेला एक वर्गखोली उपलब्ध असून पिण्याच्या पाण्याची सोय असल्याची खोटी माहिती भरण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.पवनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अत्री येथील जिल्हा परिषद इमारतीचे वास्तव लोकमतने मांडले आहे. यात यू-डायसची माहिती आता समोर आली असून यात शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांची कुचंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असले तरी, इमारत निर्लेखित झाली असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने मागील वर्षीपासून सर्व शाळांची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती यू-डायसमध्ये नोंदविली जात आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच त्यांच्या अकार्यक्षमेतुळे येथील शाळांची वास्तविकता चव्हाट्यावर येण्याच्या भीतीने नवी शक्कल शोधून काढत यू-डायसलाच चपराक दिली आहे. अत्री येथील शाळेची अद्यावत माहिती यू-डायसवर नसल्याने जिल्ह्यातील अन्य शाळांच्या भरलेल्या माहितीबाबतही शंका उत्पन्न होत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे शासनाला शाळांची अद्यावत माहिती उपलब्ध होवू शकत नाही व अशामुळेच शाळा सोयीसुविधांपासून वंचित राहणार आहे.शिक्षण विभागाचा जावईशोध विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक सुविधा करून देणे शिक्षण विभागाचे कर्तव्य आहे. परंतु, अत्री शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ती होणे गरजेचे आहे. मात्र, शिक्षण विभागाने जावईशोध करून गावातील सार्वजनिक नळावरून पिण्याचे पाणी भरण्याचे सुचविले व शाळेत पाण्याची व्यवस्था असल्याची नोंद यू-डायसमध्ये करण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदची एकही शाळा इमारत किंवा वर्गखोली विरहित नाही. परंतु अत्री येथील दोन्ही वर्गखोली निर्लेखित झाल्याने ही माहिती यू-डायसमध्ये नमूद करण्यात आल्यास शिक्षण विभागाचा दांभिकपणा उघड होणार असल्याने पवनी पंचायत समितीने शिक्षकांना माहिती भरण्याचे प्रशिक्षण ठेवले होते. तज्ज्ञांनी दोन्ही वर्गखोली सुस्थितीत असल्याची माहिती भरण्याच्या सूचना मुख्याध्यापकाला दिलेल्या होत्या.