शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

टँकरखाली चिरडून दोन महिला मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:24 IST

भरधाव टँकरच्या मागच्या चाकात चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरी बुज. येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही महिला मॉयल खाणीत मजूर म्हणून कामाला होत्या. टँकरही मॉयलचाच होता. या अपघातानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर गावावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देडोंगरी येथील घटना : मॉयल खाणीतून दुचाकीने जात होत्या घरी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भरधाव टँकरच्या मागच्या चाकात चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरी बुज. येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही महिला मॉयल खाणीत मजूर म्हणून कामाला होत्या. टँकरही मॉयलचाच होता. या अपघातानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर गावावर शोककळा पसरली.वंदना हिरामण सोनेकर (३९), सुनीता जीवन चौधरी - कोहळे (४४) दोन्ही रा. डोंगरी बुज. अशी मृत महिलांची नावे आहेत. गुरुवारी वंदना आणि सुनीता मॉयल खाणीतील काम आटोपून आपल्या दुचाकीने (क्र. एम एच ३६ व्ही ३८६०) ११ वाजताच्या सुमारास डोंगरी बुजकडे जात होत्या. मॉयल खाणीबाहेरील गाव शिवारात समोरुन येणाऱ्या पाण्याच्या टँकरने (एम एच ३६ एफ ०९३४) ने दुचाकीला धडक दिली. यात धडकेत या दोघेही दुचाकीसह टँकरच्या मागील चाकात चिरडल्या गेल्या. आणि जागीच ठार झाल्या. सदर टँकर डोंगरी बुज येथून मॉयल खाणीमध्ये पाणी घेवून जात होता. सदर अपघातानंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. मॉयलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सदर टँकर अनियंत्रीत वेगाने जात असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. या दोन्ही महिलांची शेती मॉयल खाणीत गेली होती. त्यामुळे त्यांना मॉयल प्रशासनाने नोकरी दिली होती. वंदनाच्या मागे एक मुलगा आणि सुनीताच्या मागे एक मुलगी आहे. अपघाताचे वृत्त कळताच डोंगरी बुज. येथील नागरिकांनी घटनास्थळी ्नधाव घेतली. दोघींचे मृतदेह पाहून प्रत्येक जण हळहळतांना दिसत होता. पोलिसांनी पंचनामा केला.टँकर भंगारावस्थेतीलमॉयलमधील पाण्याचा सदर टँकर भंगार अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यानंतरही मॉयल प्रशासन या टँकरचा उपयोग करीत होते. या अपघाताची चौकशी करुन महिला मजुरांच्या कुटुंबातील सदस्यांना मॉयल प्रशासनाने नोकरी देण्याची मागणी डोंगरी बुज. चे माजी सरपंच तोफलाल रहांगडाले यांनी केली आहे.