शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेतकरीपुत्रांनी साकारला दुचाकीवरील मोटरपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:28 IST

आॅगस्ट महिना सुरू झाला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. जून, जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : एक लिटर पेट्रोलमध्ये एक एकर शेतीला देता येऊ शकते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आॅगस्ट महिना सुरू झाला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. जून, जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. दोनदा पेरणी केल्यानंतरही पावसाने दगा दिल्यामुळे पºहे करपले आहेत. दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे पिकांना जगविण्यासाठी पाच शेतकºयांच्या मुलांनी एकत्र येऊन दुचाकीवर मोटरपंप तयार केला आहे. या मोटरपंपाच्या सहाय्याने शेतीला पाण्याची सुविधा केली आहे. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकºयांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरणारा आहे.भंडारानजिकच्या खोकरला या गावातील मंगेश श्रीराम ढेंगे, मनोहर श्रीराम धांडे, खुशाल उरकुडा मते, रूपेश राजू कडव, आशिक कुसन बांते रा.खोकरला ही पाचही मुले शेतकºयांची आहेत. मंगेश हा १२ वी तर मनोहर व खुशाल हे दोघेही नववा वर्ग उत्तीर्ण आहे.रूपेश हा सातवी तर आशिक हा पदवीधर असून त्याने आयटीआयचे तांत्रिक शिक्षण पूर्ण केले आहे. शेतकºयांना पिकांसाठी पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने दुचाकीच्या सहाय्याने मोटरपंप चालू शकतो, अशी संकल्पना या तरूणांच्या डोक्यात आली व त्याला मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी धावपळ सुरू केली.सदर पंप तयार करण्यासाठी ३ अश्वशक्ती पंपाचा आकार असलेला एक लोखंडी ढाचा, पंपाच्या आतमध्ये असलेला एक पंखा, व पंख्याला फिरविणाºया पंपाचे रॉडला दाते असलेला एक व्हील वेल्डींग करण्यात आला.या पंपाला ३ इंचाचे पाईप लावून त्या पाईपला शेवटच्या टोकाला एक फुटबॉल लावण्यात आला. त्यानंतर सदर पंप हा दुचाकीच्या डाव्या बाजुच्या फुटस्टँडच्या ठिकाणी एक लोखंडी स्टँड लावून त्यावर सदर पंप फिट करण्यात आले. दुचाकीच्या मागच्या शॉकअप लगत दुचाकीची चैन लहान करून तिला व्हीलवर टाकण्यात आली. त्यानंतर ज्या ठिकाणाहून पाणी ओढावयाचे आहे अशा विहीर,नाला, नदी किंवा तलाव परिसरात दुचाकी उभी करण्यात येते.दुचाकीला पहिल्या गिअरमध्ये घेतली जाते. त्यानंतर लगेच दुसºया व तिसºया गिअरमध्ये टाकण्यात येते. यामुळे लगेच फॅनच्या एॅम्पुलरव्दारे कॉम्प्रेसर बनतो. दुचाकीची गती ५० ची ठेवल्याने मोटरपंपातून पाण्याचा प्रवाह सुरू होतो.सदर पाण्याचा प्रवाह हा ३ इंच अशा पाईपमधून वेगाने बाहेर पडून दिड तासामध्ये एक एकर शेती सिंचित करता येत असल्याचा दावा या युवकांनी केला आहे. अर्धा तास दुचाकी बंद करून पुन्हा सुरू करून पाण्यासाठी सदर पंपाचा उपयोग करता येऊ शकते.यासाठी एक लिटर पेट्रोल लागत असून कुठल्याही ठिकाणी सदर दुचाकीच्या सहाय्याने चालणारा हा पंप नेआण करण्यासाठी सोयीचे आहे. यापासून दुचाकीच्या इंजिनचे कोणतेही नुकसान नसल्याचे या तरूणांनी यावेळी बोलताना सांगितले.