शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:37 IST

कोका-खडकी मार्गावर दुचाकी चालकाला रानडुकराने धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविंद्र युवराज साठवणे (३५) रा. कोका असे मृत तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्देखडकी-कोका मार्गावरील घटना : पाच तासानंतर उचलला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोका-खडकी मार्गावर दुचाकी चालकाला रानडुकराने धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविंद्र युवराज साठवणे (३५) रा. कोका असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तब्बल पाच तासांपर्यंत रस्ता रोखून धरला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी वेळीच न पोहचल्याने तणाव वाढला. नागरिक व शासन प्रशासनात धुमश्चक्री चालली. वरिष्ठ वनाधिकारी व पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा ताफा दाखल झाला. अखेर आंदोलकासमोर अधिकाºयांनी चूक मान्य करीत मदतीचे आश्वासन दिल्याने पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेतला.कोका येथील रविंद्र साठवणे यांची कापड शिवण्याचा व्यवसाय खडकी येथे आहे. कामानिमित्त ते सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास घरुन खडकी येथे जाण्यास मोटारसायकल क्र. एम एच ३६ एम ९६७८ ने निघाले. कोका ते खडकी दरम्यान प्रादेशिक वनविभागाचे जंगल असून सदर परिसर कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफरझोनमध्ये मोडतो. कोका ते खडकी दरम्यान दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने आडव्या दिशेत जाणाºया रानडुकराने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे रविंद्र यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यावर कोसळले. यात डोक्याला गंभीर दुखापत व रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच त्याचा मृत्यू झाला.खडकी व कोका गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. करडी पोलीस विभागाचे पोलिस निरिक्षक तुकाराम कोयंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाºयांची वाट पाहत खडकी येथे दोन तास वाट पाहत असल्याने नागरिकांचाही संयमाचा बांध फुटला. जंगल भाग असल्यामुळे वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. अशा स्थितीतही अधिकारी वेळेवर पोहचत नाहीत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के. बी. चौरागडे, कोकाचे जि.प. सदस्य उत्तम कळपाते, उपसभापती विलास गोबाडे, सरपंच भुपेंद्र पवनकर, नरविर टेकाम, रवी तिडके, हितेश सेलोकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी रस्ता रोखून धरला. तसेच मृतकाच्या कुंटबीयाला तात्काळ अर्थिक मदत करून एका सदस्याला नोकरी द्यावी, रस्त्याच्या दुर्तफा तारेचे कुंपण घालावे, दोषी वनाधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी लावून धरली. नागरिकांनी यावेळी शासनाचा निषेध नोंदवित अधिकाºयांच्या कारभारावर असंतोष व्यक्त केला.लोकांचा वाढलेला आक्रोश व मृतदेह उचलू न देण्याचा इशारा देण्यात आल्याने घटनास्थळी आ. चरण वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपवनसरंक्षक हौश्ैिंग यांनी घटनास्थळी धाव घेत त्वरीत ८ लाखाची आर्थिक मदत घोषीत केली. तसेच २० हजार रूपयांची तत्काळ मदत देण्यात आली. मृताच्या पत्नीला वनविभागात तात्पुरती नोकरी तसेच अन्य मागण्यांचे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले.