शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला चारचाकीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST

एक ठार, एक जखमी : गडेगाव येथील घटना लाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव येथे भरधाव वेगाने ...

एक ठार, एक जखमी : गडेगाव येथील घटना

लाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव येथे भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकी चालकाने चारचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. विशाल भागवत मुंगमोडे (वय २०, रा. सेंदूरवाफा) असे मृताचे, तर अरुण भैसारे (२२, रा. साकोली) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

नीतेश पवनकर हे चारचाकी वाहनाने (एमएच ३६ एच १७२१) महिलांना घेऊन लाखनीहून रावणवाडीकडे राष्ट्रीय महामार्गाने जात असताना पाठीमागून येणार्‍या दुचाकी (एम. एच. ३६ ए ००१३) ने धडक दिली. अरुण भैसारे व विशाल भागवत मुंगमोडे हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे दुचाकी चालवून गडेगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ चारचाकीला पाठीमागून धडक दिली. यात विशाल भागवत मुंगमोडे व अरुण भैसारे गंभीर जखमी झाले.

जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुचाकीवर मागे बसलेले विशाल भागवत मुंगमोडे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी कलम २७९, ३३८, भादंवि सहकलम १८४ मोवाकानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज वाडिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलीस हवालदार संजय अरकासे करीत आहेत.

160821\img-20210816-wa0094.jpg

photo